तरुण भारत

एप्रिलमध्ये खत विक्रीत 45 टक्के वाढ

समाधानकारक मान्सूनच्या संकेतामुळे विक्री तेजीत

नवी दिल्ली  :

Advertisements

संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरु असल्यामुळे गेल्या महिन्याभरापासून उत्पादन प्रकल्प आणि डीलर शोरुम सर्व काही बंद होते तर वाहन कंपन्यांचे एप्रिलमधील विक्रीचे आकडे शुन्यावर आले. म्हणजेच वाहनांची विक्री न के बराबर राहिली. वर्षाच्या आधारावर खताची विक्री मात्र 45.1 टक्क्मयांनी वधारली असल्याची माहिती खत विभागाकडून सादर करण्यात आलेल्या आकडेवारीमधून समोर आली आहे. देशभरात नायट्रोएट विक्री एप्रिल 2020 मध्ये 20.56 लाख टन राहिली आहे. 

युरियाची विक्री एप्रिलमध्ये वर्षाच्या तुलनेत 36.2 टक्क्मयांनी वाढून 1095 लाख टनाच्या घरात पोहोचली आहे. एप्रिल 2019 मध्ये 8.04 लाख टन युरियाची विक्री झाली होती. डाय अमोनिया फॉस्फेटची विक्री 71.7 टक्क्मयांनी वाढून 2.97 लाख टन झाली आहे तर नायट्रोजन फॉस्फरस पोटॅशियम कप्लेक्स फर्टिलायजर्सची विक्री 81.4 टक्क्मयांनी वाढून 3.9 लाख टन झाली असून पोटॅशियम म्यूरिएटची विक्री 43 टक्क्यांनी वधारुन 1.33 लाख टनाच्या घरात पोहोचली आहे.

हवामानाच्या अंदाजामुळे विक्रीत तेजी

मध्यंतरी हवामान खात्याने यंदा चांगला मान्सून होणार असल्याचा अंदाज वर्तवला होता. या पावसाळय़ाचे भाकीत लक्षात घेऊन शेतकऱयांनी पुढील कार्यवाहीला सुरूवात केली असून खताच्या खरेदीवर त्यांचा भर दिसतो आहे. सध्या शेतकरी विविध पिकांसाठी लागणाऱया खते बि बियाणांच्या खरेदीवर भर दिला असल्याने कंपन्यांची खते जादा प्रमाणात विक्री होत असल्याची माहिती खत उद्योग क्षेत्रातील एका अधिकाऱयाने दिली.

Related Stories

देशात ‘ईबाईकगो’ स्मार्ट चार्जिंग स्टेशन्स उभारण्याच्या तयारीत

Patil_p

तेलाच्या किमती घसरल्याने देशाचा तेल आयात खर्च घटून निम्यावर येण्याचे संकेत

tarunbharat

इलेक्ट्रिक बसचे योगदान वाढणार

Patil_p

लॉकडाऊन उघडल्यावर दीड कोटी रोजगार परतणार!

Patil_p

खाद्यतेलाची आयात जूनमध्ये सर्वाधिक

Patil_p

नोकियाचे स्मार्ट टीव्ही दाखल

Omkar B
error: Content is protected !!