तरुण भारत

तडवळेत शेतजमिनीच्या कारणावरून मारामारी

प्रतिनिधी/ वडूज

तडवळे ता.खटाव येथे शेतजमिनीच्या कारणावरून दोन कुटूंबात जोरदार मारामारी झाली. या मारामारीत डोक्यास जबरी मार लागल्याने एकजण गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर दहिवडी येथे खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या प्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल झाल्या आहेत.

Advertisements

याबाबत फिर्यादी बाबुराव सोपान साबळे (वय 55 ) यांनी दिलेल्या माहितीनुसार श्री. साबळे व त्यांची पत्नी विद्या हे रविवारी सकाळी साडे दहा वाजता गावातील माळ नावाच्या शिवारात नांगरटीसाठी गेले होते. सदरची गट नं. 45 मधील दोन एकर जमीन त्यांनी गावातील हसन बकस शेख यांच्याकडून सुमारे दहा वर्षापूर्वी खुशखरेदी केली आहे. सद्या हसन हे मयत असून नांगरटीवेळी त्यांचे पूत्र शौकत शेख, महंमद शेख जमिनीच्या ठिकाणी आले. व या जमिनीची कोर्टकेस चालू असताना तुम्ही वहिवाट कशी काय घालत आहात असे विचारणा करत शिवीगाळ सुरू केली. दोन्ही कुटूंबात भांडण विकोपास गेल्यानंतर शेख बंधूंनी हातातील तुटके खोरे तसेच कुहाडीच्या दांडय़ाने डोके, छातीवर मारहाण केली. तर भांडण सोडावण्यासाठी आलेल्या साबळे यांच्या पत्नी विद्या यांनाही मारहाण केली.या मारहाणीत बाबुराव साबळे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर दहिवडीत खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. 

तर दुस्रया बाजूला शौकत शेख (वय 35) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, गट नं 45 मधील जमीन आपले वडीलांनी साबळे यांना खुशखरेदी दिली होती. परंतू या जमिनी संदर्भात आपल्या आत्या लालन रज्जाक शेख यांच्याशी न्यायालयीन वाद चालू आहे. असे असताना खाण्यासाठी दिलेले क्षेत्र खुशखरेदी आहे असे समजून साबळे वहिवाट घालत आहेत. त्यांना आटकाव केला म्हणून त्यांनी शिवीगाळ करत कुहाडीच्या तुंब्याने हातावर तसेच डोक्यांवर मारहाण केली आहे. याबाबत वडूज पोलीस स्टेशनमध्ये परस्पर विरोधी फिर्यादी दाखल झाल्या आहेत. 

Related Stories

देशातील सर्वाधिक शेतकऱ्यांच्या आत्महत्या महाराष्ट्रात

datta jadhav

मायक्रो फायनान्स कंपनीच्या दमदाटी विरोधात महिलांचा मोर्चा

Abhijeet Shinde

राज्याची परिस्थिती चांगली कशी : चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

सोलापुरात कोरोनाचा दुसरा बळी

Abhijeet Shinde

साध्या पद्धतीने लग्नग्नविधी अन 66 हजार कोरोना कोविड 19 साठी निधी

Patil_p

बांधकामचे कर्मचारी पाच वाजताच गायब

Abhijeet Shinde
error: Content is protected !!