तरुण भारत

यंदा नोकरभरती नाही; राज्य सरकारचा मोठा निर्णय

ऑनलाईन टीम / मुंबई : 

कोरोनामुळे राज्यावर आलेले आर्थिक संकट पाहता यंदा आरोग्यसेवा वगळता इतर विभागातील नोकर भरती थांबवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्य सरकारच्या वित्त विभागाने याबाबतचा आदेश जारी केला आहे. 

Advertisements

कोरोनामुळे राज्य सरकार आर्थिक संकटात आहे. त्यामुळे प्रत्येक विभागाने आपल्या चालू योजनांचा आढावा घेऊन ज्या योजना पुढे ढकलण्यासारख्या आहेत त्या पुढे ढकलाव्यात किंवा रद्द करण्याचा निर्णय घ्यावा. प्रत्येक विभागाला यंदा बजेटच्या केवळ 33 टक्केच रक्कम मिळणार आहे. 

यंदा शासकीय खर्चात 67 टक्के कपात करण्याचा निर्णय घेण्यात आल्यामुळे कोणीही नवीन योजना सादर करू नये. वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, अन्न व नागरी पुरवठा, मदत पुनर्वसन हे प्राधान्य क्रमाचे विभाग ठरवण्यात आले असून, या विभागांनी केवळ कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी आपला निधी खर्च करायचा आहे, असेही वित्त विभागाने आदेशात म्हटले आहे. 

Related Stories

नगरसेवक निवडणार नगराध्यक्ष

amol_m

मोदींनी संकटाचा ही इव्हेंट करायचं ठरवलंय : जितेंद्र आव्हाड

prashant_c

मराठा आरक्षणावरुन पंकजा मुंडे आक्रमक; केली ‘ही’ घोषणा

Rohan_P

उदय सामंत यांची मंत्रिपदावरून तात्काळ हकालपट्टी करा; भाजप आमदाराचे राज्यपालांना पत्र

Rohan_P

”मुख्यमंत्र्यांना संघर्ष नको असेल तर त्यांनी संवादातून मार्ग काढावा”

triratna

”असे वाटले की मी संसदेत नाही तर पाकिस्तानच्या सीमेवर उभा आहे ”

triratna
error: Content is protected !!