तरुण भारत

सोलापुरात 10 नवे कोरोनाचे रुग्ण, कोरोना बाधितांची संख्या 145 वर

तरुण भारत संवाद प्रतिनिधी/सोलापूर

सोलापुरात नव्याने 10 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये कोरोनाने 9 वा बळी घेतला आहे. आतापर्यंत 9 मृत आहेत. आज दोघे तर आतापर्यंत 24 जण बरे होऊन घरी गेले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 145 वर पोहचली असून उर्वरित 112 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज, मंगळवारी दिली.

दरम्यान, मृत्यू पावलेली महिलाही 63 वर्षाचे असून सदर बाजार लष्कर येथील रहिवासी होती. 3 मे रोजी उपचारासाठी दाखल झाली होती. 4 मे रोजी उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज 169 अहवाल प्राप्त झाले. त्यातील 159 अहवाल निगेटिव्ह आले तर 10 अहवाल पॉझिटीव्ह आले. यामध्ये पाच पुरुष, पाच महिलांचा समावेश आहे. यातील शास्त्रीनगर एक, सदर बझार लष्कर 1, पोलीस मुख्यालय ग्रामीण एक, राहुल गांधी झोपडपट्टी 2, दक्षिण सोलापूर येथील उळे 1, येथील हुडको कॉलनी विजापूर रोड 1, कामातिपुरा एक, एकता नगर भागातील 1, नीलम नगर 1 येथील रुग्णांचा समावेश आहे. केगाव येथील इन्स्टिट्यूशन कोरणटाईमधून आतापर्यंत 44 व्यक्ती बरे होऊन घरी गेले आहेत. आज 10 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्यामुळे शहर जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे.

सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती

होम क्वारंटाईनमध्ये: 2186

आयसोलेशन वार्डात – 2407

एकूण अहवाल प्राप्त : 2172

आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 2027

आतापर्यंतअहवाल पॉझीटीव्ह : 145

अहवाल प्रलंबित- 235

बरे होऊन घरी गेले- 24

मृत : 0 9

Related Stories

पत्रकारांसाठी मध्य प्रदेश सरकारने घेतला महत्वाचा निर्णय

Shankar_P

महाराष्ट्र : ‘या’ तारखेपासून सुरू होणार पाचवी ते आठवीचे वर्ग

pradnya p

सोलापूर ग्रामीणमध्ये २०५ तर शहरात ५२ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

Shankar_P

भारतात मागील 24 तासात 60,963 नवे कोरोना रुग्ण, 834 मृत्यू

datta jadhav

आग्रा – लखनऊ एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात 5 जण ठार

pradnya p

शनिपार चौकात महाविकास आघाडीतर्फे आंदोलन

pradnya p
error: Content is protected !!