तरुण भारत

टाटा स्टील भारतीय पोलाद संघातून बाहेर

कंपनीचे सीईओ नरेंद्रन यांचा राजीनामा

वृत्तसंस्था / नवी दिल्ली

Advertisements

टाटा स्टील लिमिटेडने भारतीय पोलाद संघाची (आयएसए) सदस्यता सोडली आहे. आयएसए ही पोलाद उद्योगाची मुख्य संघटना आहे. संघाची सदस्यता सोडल्यामुळे कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी टी.व्ही.नरेंद्रन यांनी संघाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. परंतु नरेंद्रन यांना या पदावर येत्या ऑगस्टपर्यंत राहावे लागणार असल्याची माहिती आहे.

संघाची अध्यक्ष निवड ही दोन वर्षांच्या कालावधीसाठी राहते. टाटा स्टीलच्या प्रवक्त्यांनी याबाबतचे स्पष्टीकरण दिले आहे. टाटा स्टीलने भारतीय पोलाद संघाची सदस्यता सोडण्याचा निर्णय विविध गोष्टींचा आढावा घेऊन घेतला आहे. याच कारणाचे स्पष्टीकरण देत नरेंद्रन यांनी आयएसएचे अध्यक्षपद सोडले असल्याचे म्हटले जात आहे. परंतु पद का सोडले याबाबत कोणतेही स्पष्टीकरण नरेंद्रन यांनी दिले नाही.

आयएसएचे सदस्य

जेएसडब्लू स्टील, स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया, राष्ट्रीय पोलाद निगम लिमिटेड, जिंदाल स्टील ऍण्ड पॉवर आणि आर्सेलर मित्तल निप्पॉन स्टील यासारख्या कंपन्या आयएसएच्या सदस्य आहेत. तर नरेंद्रन विश्व पोलाद संघाचे(वर्ल्डस्टील) कार्यकारी समिती सदस्य आहेत.

Related Stories

मोबाईल ऍप आधारित पेमेंट 163 टक्क्मयांनी वाढले

Patil_p

आर्थिक घोषणेमुळे बाजारात तेजीची उसळी

Patil_p

बाजारातील तेजीच्या प्रवासाला अखेर विराम !

Patil_p

रियलमीचे वर्षा अखेरपर्यंत कर्मचारी संख्या वाढविण्याचे ध्येय

Patil_p

जीएमआर एअरपोर्टस् 3 हजार कोटी जमवणार

Patil_p

एचडीएफसीने घटविले व्याजदर

Amit Kulkarni
error: Content is protected !!