तरुण भारत

एमआय 10 स्मार्टफोन 8 ‘मे’ला बाजारात

लॉकडाऊनमुळे सादरीकरणास विलंब : प्री बुकिंग 8 मे पासून

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  

Advertisements

शाओमीचा एमआय 10 स्मार्टफोन येत्या 8 मे रोजी भारतीय बाजारात सादर करण्यात येणार असल्याची माहिती कंपनीने ऑनलाईन पत्रकार परिषदेत दिली आहे. देशात या स्मार्टफोनचे सादरीकरण लाईव्ह स्ट्रीमिंग कार्यक्रमाच्या आधारे  करण्यात येणार असून या संदर्भातील तपशील कंपनी लवकरच सादर करणार  आहे.

गेले दोन महिने मोबाइल कंपन्या संकटात आहेत. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशात लॉकडाऊन कडक पाळण्यात आला. आता कंपनी नव्या फोनचे ऑनलाइन सादरीकरण करणार आहे. सदर नव्या स्मार्टफोनमध्ये 108 मेगापिक्सल कॅमेऱयासोबत 8 के व्हिडीओ रिकॉर्डिगची सुविधा देण्यात येणार आहे. 8 मे ते 17 मे पर्यंत सुरु राहणाऱया प्रीबुकिंगमध्ये ग्राहकांना 2499 रुपयांचा वायरलेस पॉवर बँक मोफत मिळणार असल्याचे कंपनीने सांगितले आहे.

या स्मार्टफोनचे सादरीकरण 31 मार्च रोजी करण्यात येणार होते. सध्या तिसऱया टप्प्यातील लॉकडाऊनचे सत्र सुरु आहे. यामुळे एमआय स्मार्टफोनचे सादरीकरण ऑनलाईन पद्धतीने करण्याचा निर्णय कंपनीकडून घेण्यात आला आहे. मार्चमध्ये इटली, फ्रान्स, जर्मनीसह अन्य देशांमध्ये फोनचे सादरीकरण करण्यात आले आहे.

Related Stories

रेडमीचा एक्स सिरीजचा स्मार्ट टीव्ही दाखल

Patil_p

माजी सीईओ स्थापणार विमान कंपनी

Patil_p

एप्रिलमध्ये विदेशी गुंतवणूक 60 टक्के वाढली

Amit Kulkarni

सेन्सेक्समध्ये 500 अंकांची उसळी

datta jadhav

रोनाल्डोच्या निर्णयाचा कोकाकोला’ला फटका

Patil_p

अदानी ग्रीनकडून एसबी एनर्जीची खरेदी

Amit Kulkarni
error: Content is protected !!