तरुण भारत

सुरुवातीची तेजी गमावत सेन्सेक्सची घसरण

सेन्सेक्स 262 अंकानी घसरला : निफ्टीतही घसरण

वृत्तसंस्था / मुंबई 

Advertisements

भारतीय शेअर बाजाराने चालू आठवडय़ातील दुसऱया दिवशी मंगळवारी सुरुवातीला प्राप्त केलेली तेजी गमावत सेन्सेक्सचा व्यवहार बंद झाला आहे.  दिवसभरातील व्यवहारानंतर सेन्सेक्स दिवसअखेर 261.84 अंकानी घसरून निर्देशांक 31,453.51 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजारातील निफ्टी 87.90 अंकानी घसरत निर्देशांक 9,205.60 वर बंद झाला आहे.

दिवसभरातील व्यवहार समाप्त होताना बाजारातील आर्थिक कंपन्यांच्या समभागांची अचानकपणे विक्री झाल्यामुळे शेअर बाजारात दबावाचे वातावरण निर्माण झाले. याच कारणामुळे बीएसई सेन्सेक्स दिवसभरातील उच्चांकी अशा 810 अंकानी पातळीखाली येत घसरणीसह सेन्सेक्स बंद झाला आहे.

बीएसईमधील प्रमुख कंपन्यांमधील समभाग चार टक्क्मयांपेक्षा अधिक घसरले आहेत. यात स्टेट बँकेचे समभागात मोठी घसरण राहिली आहे. सोबत बजाज फायनान्स, एशियन पेन्ट्स, ऍक्सिस बँक, कोटक बँक आणि आयसीआयसीआय बँक यांच्या समभागांची पडझड झाली आहे. मात्र महिंद्रा ऍण्ड महिंद्रा, पॉवर ग्रिड कॉर्प, ओएनजीसी आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे समभाग वधारले आहेत.

जागतिक पातळीवरील होणाऱया घडामोडी आणि त्यामध्ये कोरोनाच्या संकटामुळे निर्माण झालेली आपत्तीजनक स्थिती यामुळे गुंतवणूकदार शेअर बाजारात गुंतवणूक दबावामध्ये करत असल्याचे चित्र पहावयास मिळत असल्याचे तज्ञांकडून सांगितले जात आहे. याचाच परिणाम म्हणून सोमवारी आठवडय़ातील पहिल्या सत्रात लॉकडाऊनच्या कालावधीमधील सर्वात मोठी 8 वी घसरण झाली होती.

याचाच प्रभाव म्हणून पुन्हा मंगळवारी सेन्सेक्स व निफ्टीची घसरण झाली आहे. आशियाई बाजारात हाँगकाँगचा शेअर बाजार वधारत बंद झाला तर चीन शांघाय, टोकीयो
आणि सोलच्या बाजाराची कामगिरी समाधानकारक झाल्याचे पहावयास मिळाले आहे. 

Related Stories

रेल्वे मालवाहतुकीत 10 टक्के वाढ

Patil_p

लेदर उद्योगाला बाहेर काढा

Patil_p

बजाज कन्झुमरचा नफा 135 टक्के वाढला

Patil_p

असुसचा नवा लॅपटॉप बाजारात सादर

Patil_p

सलग सहाव्या तिमाहीत बँक क्रेडिट वृद्धीत घसरण

Patil_p

‘वर्क फ्रॉम ऍनीवेअर’ टाटा स्टीलची योजना

Omkar B
error: Content is protected !!