तरुण भारत

अबब सोमवारी तब्बल 17 कोटी 94 लाखाची दारू विक्री

प्रतिनिधी/ बेळगाव

लॉकडाऊनमुळे अनेकांना जीवनावश्यक वस्तू मिळाल्या नाहीत. मात्र, त्यांनी कसे बसे जीवन रेटत नेले. या लॉकडाऊनमध्ये सर्वात कोंडी निर्माण झाली ती मद्यप्रेमींची. मद्य मिळत नसल्यामुळे अनेकजण तणावाखाली आले होते. सोमवारी दारू दुकाने उघडताच खरेदीसाठी एकच गर्दी उसळली. सोमवारी एकाच दिवशी जिल्हय़ात तब्बल 17 कोटी 94 लाख रुपयांची दारू विक्री झाल्याची माहिती अबकारी खात्याचे उपायुक्त वाय. मंजुनाथ यांनी दिली.

Advertisements

सोमवारी दारू दुकाने खुली करणार असे म्हणताच मद्यप्रेमींनी एकच जयघोष केला. त्यांची उत्कंठाही शिगेला पोहोचली. काही ठिकाणी फटाक्यांची आतषबाजी करून स्वागत केले. सकाळी दारू दुकानांसमोर तळीरामांनी रांगा लावल्या होत्या. दारू विक्री सकाळी 9 पासून सायंकाळी 7 या वेळेत देण्यात आली होती. मात्र, काही ठिकाणी गोंधळ उडाल्याने दारू दुकाने लवकर बंद करण्यात आली.

मद्यपींनी सोमवारी 3 लाख 79 हजार 757 लिटर दारू खरेदी केली. तर 99 हजार 857 लिटर बियर खरेदी केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेक जण दारू पासून वंचित होते. मात्र, सोमवारी दारू खरेदी करून मनसोक्त आनंद लुटला आहे. सोमवारनंतर मंगळवारीही दारू दुकाने उघडी होती. सोमवार असल्यामुळे केवळ दारूवरच काही जणांनी आनंद लुटला. मात्र मंगळवारी दारूबरोबर मांसाहारी जेवणावरही ताव मारला आहे. अनेकांना जीवनावश्यक वस्तू मिळत नाहीत म्हणून आरडओरड होते. मात्र मद्यपींनी लावलेल्या दारूसाठीच्या रांगांमुळे खरोखरच आश्चर्य व्यक्त होत होते.

काही दुकानदारांनीही पहिल्या ग्राहकाचे स्वागत केले होते. गळय़ात पुष्पहार घालून दारू विक्री केली. दारू देताना काही नियम घालण्यात आले होते. काही जणांनी अधिक दारूची मागणी केली. मात्र, नियमानुसार त्यांना दारू देण्यात आली आहे. मास्क घातलेल्या व्यक्तीलाच दारू देण्यात आली. याचबरोबर सॅनिटायझरचाही उपयोग करावा, असे सांगण्यात आले. सर्व नियम पाळूनच दारू विक्री सुरू आहे. सध्या सोशल मीडियावर दारू पुन्हा बंद केली जाणार असे सांगण्यात येत आहे. मात्र, दररोज सकाळी 9 ते सायंकाळी 7 पर्यंत दारू दुकाने सुरू राहतील. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहनही वाय. मंजुनाथ यांनी केले आहे.

Related Stories

सुखी संसारासाठी संस्कार महत्त्वाचे

Omkar B

स्मार्ट बसस्थानकाचे काम पूर्णत्वाकडे

Amit Kulkarni

एपीएमसीच्या प्रगतीसाठी विविध मागण्यांचे सहकारमंत्र्यांना निवेदन

Patil_p

चारा, पाणी प्रश्नाबाबत आतापासूनच काळजी घेणे गरजेचे

Amit Kulkarni

आज आणखी दोन कोरोनामुक्तांना डिस्चार्ज

Rohan_P

बैलूर येथे सीआरपीएफ अधिकारी शाईन कुमार यांचा सत्कार

Amit Kulkarni
error: Content is protected !!