तरुण भारत

गांधीनगरातील भाडेतत्वार असणाऱ्या दुकानांचे भाडे माफ करा : करवीर शिवसेनेची मागणी

कोरोनामुळे बंद आहेत दुकाने उचगांव / प्रतिनिधी

गांधीनगर ही पश्चिम महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठ असून येथे कापड, साडी, इलेक्ट्रॉनिक्स, प्लायवूड, होजीअरी, रेडिमेड, सुटींग शर्टिंग, फर्निचर, कटलरी, इलेक्ट्रिकल्स इत्यादी वस्तूंची होलसेल व रिटेल अशी हजारो दुकाने आहेत. बरीच दुकाने ही भाडेतत्वावर तर काही स्वतःच्या मालकीच्या दुकान गाळ्यामध्ये आहेत. भाडे तत्वावर असणाऱ्या दुकानाचे भाडे हे साधारण ५० हजार रुपयाच्या पटीमध्ये आहे. जागतिक आपत्तीत ही दुकाने साधारण दिड महिने लॉकडाऊन काळात बंद असून, दुकाने बंद असल्यामुळे त्यांचा व्यापार झालेलाच नाही. अशा अवस्थेत दुकानगाळा मालकांनी त्यांच्याकडून भाडे वसूल करण्यासाठी तगादा लावू नये, असे आदेश राज्य सरकारने पारित केले असून, त्याची अंमलबजावणी करावी व संबंधित दुकानगाळा मालकांना भाडे वसूल न करण्याचे आदेश द्यावेत. याबाबतचे निवेदन मा. जिल्हाधिकारी कोल्हापूर यांचे नावे नायब तहसीलदार नितीन लोकरे यांना करवीर तालुका शिवसेनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. तसेच , सिंधी सेंट्रल पंचायत गांधीनगर अध्यक्ष, होलसेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, रिटेल व्यापारी संघटनेचे अध्यक्ष, फुटवेअर संघटनेचे अध्यक्ष यांनाही निवेदनाची प्रत देण्यात आली.

Advertisements

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, गांधीनगर शहर प्रमुख दिलीप सावंत, विभाग प्रमुख दीपक पोपटानी, शाखाप्रमुख दीपक अंकल, उपशाखाप्रमुख सुनील पारपाणी, किशोर कामरा, जितू चावला, शंकर चंदवाणी, राजेश सचदेव, किरण शिंगे, आदेश यादव आदी उपस्थित होते.

Related Stories

उचत : पुढील आदेशापर्यंत कंटेन्मेंट झोन कायम

triratna

सुप्रिया सुळेंनी ‘या’ कारणासाठी केली पंतप्रधान नरेंद्र मोदींना विनंती

triratna

सांगली : खरसुंडीत विद्युत मोटारी चोरणार्‍या दोघा चोरट्यांना अटक

triratna

सातारा जिल्हय़ात काँग्रेस पक्षाकडून कोरोना सहाय्यता केंद्राची स्थापना

Patil_p

कोल्हापूर : क्लिनिकमधील डॉक्टर ठरताहेत तारणहार!

triratna

लोखंडी वस्तूंच्या वापराने सुतार व्यवसाय अडचणीत

triratna
error: Content is protected !!