तरुण भारत

सातारा जिल्ह्याची चिंता वाढली; १२ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह

सारीमुळे मृत्यु पावलेल्यांचे अहवाल निगेटिव्ह, बाधित 3 रुग्ण पूर्णपणे बरे, आज सोडणार घरी

सातारा / प्रतिनिधी

Advertisements

वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथील 2, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथील 2 व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 8 असे एकूण 12 नागरिकांचा अहवाल कारोना (कोविड-19) बाधित आला आहे. यापैकी 11 निकट सहवासित असून फलटण येथील केअरसेंटर मधील एका महिला आरोग्य सेविकेचा यात समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

मृत्यू झालेल्या दोन नागरिकांचा अहवाल निगेटिव्ह

दि. 4 एप्रिल रोजी क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे मृत्यु झालेल्या 2 सारी सदृष्य नागरिकांचे तपासणीसाठी पाठविण्यात आलेले नमुने निगेटिव्ह आले असल्याचे कळविले आहे.

बाधित 3 रुग्ण कोरोना मुक्त आज घरी सोडणार

सध्या क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे दाखल असणाऱ्या 3 बाधित रुग्णांचे 14 दिवसानंतरचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्यांना आज रुग्णालयातून घरी सोडणार असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली आहे.

116 जाणांचे अहवाल निगेटिव्ह

क्रांतिसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 48 आणि कृष्णा मेडिकल कॉलेज कराड येथील 68 असे एकूण 116 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह असल्याचेही बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे यांनी कळविले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली.

Related Stories

शरद पवारांच्या पित्ताशयावर यशस्वी शस्त्रक्रिया; प्रकृती स्थिर

triratna

मराठा क्रांती मोर्चा लढवणार पुणे पदवीधरची निवडणूक

triratna

बंगाल मधून येणारे वादळ दापोलीच्या दिशेने ; रत्नागिरी जिल्ह्यात सावधतेचा इशारा

Shankar_P

नोकरभरती रद्द, चालू कामं बंद, नव्या कामांना परवानगी नाही, अर्थ खात्याचे मोठे निर्णय

triratna

साताऱ्यात सहा गाडय़ांची तोडफोड

Patil_p

बाहेरुन येणाऱयांवरुन झाली जोरदार चर्चा

Patil_p
error: Content is protected !!