तरुण भारत

राज्यातील सामाजिक कार्यकर्ते, राजकारणी प्रकाश गावकर यांचे हदरविकाराच्या झटक्मयाने निधन.

वाळपई / प्रतिनिधी

 गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते राजकारणी असे बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे सत्तरी तालुक्मयातील ठाणे रिवे येथील प्रकाश तोळयो गावकर यांनी या जगाचा निरोप घेतला. हृदयविकाराच्या तीव्र झटक्मयाने आज त्यांचे गोवा मेडिकल कॉलेजमध्ये दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास निधन झाले. ते 68 वर्षाचे होते.

Advertisements

 यासंदर्भाची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयातील ठाणे पंचायत क्षेत्रातील रीवे याठिकाणी प्रकाश गावकर यांचे वास्तव्य होते . आज सकाळी अकरा वाजण्याच्या सुमारास त्याच्या हृदयामध्ये कळा मारू लागल्यामुळे त्यांना वाळपईच्या येथील खाजगी दवाखान्यात दाखल केले होते. प्राथमिक उपचार केल्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना गोवा मेडिकल कॉलेजमध्ये पाठविण्यात आले होते. गोवा मेडिकल कॉलेजमध्ये त्यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांना हृदयविकाराचा तीव्र झटका आल्यामुळे त्यांचे दुर्दैवी निधन झाले.

 यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे एकमेव कुत्रापुत्र प्प्रेमकुमार होते. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार प्रकाश गावकर यांच्यावर बारा वर्षापूर्वी हृदय विकाराची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांना मधुमेह हाय प्रेशर अशा प्रकारच्या व्याधी जडल्या होत्या यामुळे गेल्या जवळपास पाच वर्षापासून ते यासंबंधीचे औषधे घेत होते.

परिपक्व राजकारणी.

प्रकाश गावकर परिपक्व राजकारणी होते. ठाणे पंचायतीचे चार वेळा सरपंच व जवळपास पंधरा वर्षांपेक्षा जास्त पंच सभासद म्हणून त्यांनी प्रभावी कामगिरी केली होती .त्यांच्या कारकर्दीत ठाणे पंचायत क्षेत्रातील सर्वांगीण विकासाला चांगल्या प्रकारे चालना मिळाली होती. रिवे डोंगुर्ली याप्रभागातेन ते निवडून येत होते. राज्याचे माजी मुख्यमंत्री व सध्याचे पर्ये मतदारसंघाचे आमदार प्रतापसिंह राणे यांचे कट्टर समर्थक म्हणून त्यांची विशेष ओळख होती. सुरुवातीपासूनच काँग्रेस पक्षाचे सक्रिय व प्रामाणिक कार्यकर्ते म्हणून त्यांनी आपली विषयाची प्रतिमा निर्माण केली होती. गेल्या जवळपास दहा वर्षापासून ते पर्ये मतदारसंघ काँग्रेस गट समितीचे अध्यक्ष म्हणून काम करत होते. त्याच प्रमाणे राज्यस्तरीय काँग्रेस पक्षाच्या समितीवरही  त्यांनी प्रभावीपणे काम केले होते.

सामाजिक कार्यकर्ते.

प्रकाश गावकर यांचे सामाजिक दायित्व भरभरून सांगण्यासारखे आहे. सत्तरी तालुक्मयाच्या शैक्षणिक सांस्कृतिक वैचारिक पारंपरिक विकास प्रवाहामध्ये त्यांचा चांगला वाटा होता. गोवा समाज कल्याण खात्याचा समाजसेवकाचा पुरस्कार त्यांना प्राप्त झाला होता. बोलके व्यक्तिमत्व व हसतमुख चेहरा यामुळे त्यांनी समाजातील अनेक घटकांशी आपले जिव्हाळय़ाचे संबंध निर्माण केले होते.

अंतिम दर्शनासाठी मोठी गर्दी.

प्रकाश गावकर यांचे निधन झाल्याची बातमी वाऱयासारखी सत्तरी  व राज्याच्या वेगवेगळय़ा भागांमध्ये पसरताच त्यांचे हितचिंतक समर्थक यांनी त्यांच्या अंत्यदर्शनासाठी त्यांच्या रिवे येथील निवासस्थानी गर्दी केली होती. गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांच्यासह वेगळय़ा पंचायतीचे सरपंच पंचायत सभासद नगरसेवक माजी नगरसेवक माजी पंचायत सभासद पत्रकार वेगवेगळय़ा क्षेत्रातील कार्यकर्त्यांनी त्यांच्या अंतिम दर्शनासाठी गर्दी केली. संध्याकाळी उशिरा त्यांच्या पार्थिवावर धार्मिक पद्धतीने अंतिम संस्कार करण्यात आले.

 दरम्यान यासंदर्भात आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी मुख्यमंत्री प्रतापसिंह राणे यांनी सांगितले की माझ्या राजकीय, सामाजिक क्षेत्रात या जीवन प्रवासातील एक सहकारी हरपला आहे. सत्तरी तालुक्मयाच्या वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये त्यांनी चांगल्या प्रकारचे योगदान दिले होते. प्रामाणिक व सच्चा कार्यकर्ता असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. त्यांच्या निधनाने सत्तरी तालुक्मयात वेगवेगळय़ा क्षेत्रांमध्ये निश्चित प्रमाणात त्यांची पोकळी निर्माण होणार असल्याचे प्रतापसिंह राणे यांनी स्पष्ट केले.

Related Stories

कॅसिनोंमुळे राजधानीत महिलांची सुरक्षा धोक्यात

Patil_p

अत्यावश्यक कामे सोडून इतरांना मडगाव नगरपालिकेत प्रवेश बंद

Patil_p

नाणूस बेतकेकरवाडा सातेरी ब्राह्मणी महादेव देवस्थानच्या जत्रोत्सवात धोंडगण 17 अग्निदिव्य पार करणार

Amit Kulkarni

विरोधी पक्षनेते कामत यांच्याकडून केपेतील उमेदवार नाईक यांची भेट

Amit Kulkarni

विहिरीत उडी मारून वृद्धाची आत्महत्या

Omkar B

गोवा ही सुवर्णभूमी बनविण्यासाठी सरकार कार्यरत- मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

Patil_p
error: Content is protected !!