तरुण भारत

ऑनलाईन नोंदीसाठी परप्रांतीयांची तोबा गर्दी

वार्ताहर / पुलाची शिरोली

ऑनलाईन नोंद करण्यासाठी पुलाची शिरोलीत परप्रांतीय कामगारांची महा ई सेवा केंद्रात तसेच वैद्यकीय फिटनेस प्रमाणपत्र घेण्यासाठी प्राथमिक आरोग्य केंद्रात तोबा गर्दी. परप्रांतीय कामगारांना आप आपल्या गावात जाण्यासाठी शासनाकडून परवानगी दिली जाणार आहे. त्यासाठी कामगारांना संबंधित ग्रामपंचायत व गावकामगार तलाठी कार्यालयात नाव नोंदणी करावी. असे सांगण्यात आले आहे. त्यानुसार परप्रांतीय कामगारांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती. एका दिवसात सुमारे अकराशे कामगारांची नोंदणी झाली होती. आधार कार्डद्वारे नोदणी सुरू केली होती. पण त्या कार्डवर फक्त त्या व्यक्तीच्या पहिल्या नावाचा उल्लेख होता. गाव, तालुका, जिल्हा याचा उल्लेख नाही. त्यामुळे कामगारांची माहिती सकारात्मक नसल्यामुळे हि नोंदणी बंद करण्यात आली. त्यांना आधारकार्ड घेवून महा ई सेवा केंद्रात नोंदणी करण्याची सुचना देण्यात आली.

Advertisements

त्यामुळे तेथे एकच झुंबड उडाली होती. गावातील कांही तरुणांनी मोबाईल अॅपद्वारे नोंदणी करण्यास सुरुवात केली होती. त्यानंतर प्रवासाचे निश्चित झालेल्या कामगारांनी आपला मोर्चा प्राथमिक आरोग्य केंद्रात वळविला. तेथे वैद्यकीय फिटनेस सर्टिफिकेट मिळवण्यासाठी तोबा गर्दी केली होती. शिरोली प्राथमिक आरोग्य अधिकारी डॉ. जे.जे. अँड्रूस, श्री. घोलपे, श्री. पाटील हे दिवसभर फिटनेस सर्टिफिकेट देण्यासाठी कष्ट घेत होते.

Related Stories

शरद जोशी यांचे नाव घेवून जोगवा मागणाऱ्यांनी त्यांचे काय मत समजून घ्यावे – सदाभाऊ खोत

Abhijeet Shinde

”महाराष्ट्राचे वाटोळे झाल्यानंतर पवारसाहेबांची नाराजी”

Abhijeet Shinde

कोल्हापूर : सर्व दुकाने उघडण्यास परवानगी द्यावी

Abhijeet Shinde

देश संरक्षणासाठी डोळसपणे पाहण्याची गरज

Patil_p

फडणवीसांचे ड्रग्ज पेडलर जयदीप राणाशी संबंध

datta jadhav

‘रडने का नही, भिडने का’; चित्रा वाघ यांनी घेतली तहसीलदार ज्योती देवरेंची भेट

Abhijeet Shinde
error: Content is protected !!