तरुण भारत

पुण्यातील सर्वांना आता ‘या’ वेळेत मिळणार पेट्रोल

ऑनलाईन टीम / पुणे :

पुणे जिल्ह्यातील प्रतिबंधित क्षेत्र वगळता सर्व भागांमध्ये आता पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा करण्यास परवानगी दिली गेली आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलेल्या सूचनेनंतर जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी सुधारित आदेश जारी केला आहे. 

सुधारित आदेशानुसार,  सकाळी सात ते रात्री सात या वेळात होणार सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल – डिझेल मिळणार आहे. त्यासाठी त्यांच्याकडून कोणतेही ओळखपत्र मागितले जाणार नाही. 

दरम्यान, मंगळवारी महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सर्व सामान्यांना देखील पेट्रोल मिळेल असे म्हटले होते. त्यानंतर पेट्रोल भरण्यास गर्दी होऊ लागल्याने जिल्हा प्रशासनाने केवळ अत्यावश्यक सेवा आणि प्रशासनाने परवानगी दिलेल्या वाहनांना पेट्रोल मिळेल असे सांगितले.

त्यामुळे बुधवारी सर्व सामान्यांना पेट्रोल मिळत नव्हते. त्यामुळे पुणे पेट्रोल डीलर्स असोसिएशनने उपमुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली.

त्यानंतर उपमुख्यमंत्र्यांच्या सुचनेनंतर आता जिल्हाधिकाऱ्यांनी सुधारित आदेश काढले आहेत. त्यानुसार आता सर्वसामान्यांनाही पेट्रोल – डिझेल चा पुरवठा केला जाणार आहे. 

Related Stories

पाक सैन्यांच्या गोळीबारात भारतीय लष्कराचा JCO शहीद

datta jadhav

ठाकरे सरकारकडून लवकरच साडे बारा हजार पोलिसांची भरती

pradnya p

धामणगाव : 350 वर्षांत पहिल्यांदाच आषाढी यात्रेला ब्रेक

triratna

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार भारत भालके यांचे निधन

pradnya p

मुदत संपलेल्या ग्रामपंचायतीत स्वातंत्र्यदिनी ध्वजारोहणाबाबत आदेश जारी

triratna

भारताच्या मदतीसाठी आता अमेरिकन फौजा

datta jadhav
error: Content is protected !!