तरुण भारत

रांगोळीत सहकारी संस्थेचे धान्य दुकान फोडले

प्रतिनिधी / हुपरी


 हुपरी ते इचलकरंजी रोडवर असलेल्या रांगोळी ता. हातकणंगले येथील रांगोळी विविध कार्यकारी सेवा विकास सहकारी संस्थेचे स्वस्त धान्य दुकानाच्या कुलुपाची लोखंडी पट्टी कट्टरने कट करून सहाशे रुपयांची चिल्लर लंपास केल्याप्रकरणी इचलकरंजी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात अज्ञातांच्या गुन्हा नोंद झाला आहे.

Advertisements

दरम्यान पोलीसांनी पाहणी केली असता लाखो रुपयांचे धान्याचे पोते होते. त्यानंतर सी. सी. टी. व्ही कॅमेऱ्यात दोन व्यक्ती आढळून आल्या परंतु तोंडाला कापड गुंडाळल्यामुळे समजू शकल्या नाहीत. रीतसर त्या घटनेचा पंचनामा करण्यात आला. याबाबतची घटना स्थळावरून सविस्तर समजलेली माहिती अशी की रांगोळी गावात रस्त्याच्या कडेला रांगोळी विकास सेवा सहकारी संस्था आहे त्या संस्थेचे स्वस्त धान्य दुकान असून विनय मोरे हा त्या ठिकाणी अधिकारी म्हणून काम पहात आहे. नेहमी प्रमाणे दुकानात तांदूळ व गव्हाची लाखो रुपयांची पोती भरलेली असून मंगळवार रोजी दुकान बंद केले होते. बुधवारी सकाळी स्वस्त धान्य दुकान उघडण्यासाठी आले असता कुलुपाची पट्टी कट्टरने कट केलेले दिसले. संस्थेच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात पाहिले असता रात्री दीड वाजण्याच्या सुमारास कोणी नसलेल्या वेळेत अज्ञात चोरट्यांनी हा प्रकार केल्याचा उघडकीस आला. त्यावेळी चोरीस गेलेल्या वस्तू पाहिले असता फक्त सहाशे रुपयांची चिल्लर लंपास केल्याचे निदर्शनास आले.  सध्या सर्वत्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण देशात लॉक डाउन असल्याने सर्व गावातील व्यवहार बंद करण्यात आले होते. मात्र दुकानातून पिवळ्या, केसरी कार्डावरील कार्डधारकांना रेशन दिले जात होते. सर्व किराणा मालाचे व अत्यावश्यक सेवेचे दुकाने ठराविक काळापर्यंत चालू ठेवून इतर व्यवसाय हॉटेल्स ,पान टपऱ्या, देशी दारूचे दुकान, गावठी दारूचे दुकान, बंद असल्याने हा परिसर रात्रीच्या वेळी निर्मनुष्य होता परंतु शासनाने वाईन, देशी दारू दुकान चालू करण्यास परवानगी दिल्याने मद्यापेय करणाऱ्या व्यक्तींची झोपच उडाली आहे. रात्र काय आणि दिवस त्यांना सारखाच झाला आहे.

याच घटनेचा फायदा घेऊन अज्ञात चोरट्यांनी स्वस्त धान्य दुकानच्या कुलुपाजवळील लोखंडी पट्टी कट्टरने कट करून शटर उघडून आत प्रवेश केला. त्यांनी आतमध्ये इतरत्र रोख रक्कम मिळते का पाहिले न मिळताच कॅशमध्ये असलेली सहाशे रुपयांची चिल्लर घेऊन पळून गेल्याचे निदर्शनास आले. संस्थेचे जबाबदार व्यक्ती  यांनी या चोरीची फिर्याद  इचलकरंजी शिवाजीनगर पोलिसात  दिली आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.
     

Related Stories

गांधीजींच्या विचाराशिवाय राष्ट्रसुधारणा नाही

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात कोरोनाचे ११ बळी, ४९६ नवे रुग्ण

Abhijeet Shinde

दीड वर्षांनी मार्केटची 1200 कोटींची भरारी !

Abhijeet Shinde

कोविशिल्ड लसीचा प्लांट पूर्णपणे सुरक्षित : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Rohan_P

कार्तिक स्वामी जयंती रविवारी

Abhijeet Shinde

प्राथमिक आरोग्य केंद्रात कुरघोड्यांचे`राजकारण’

Abhijeet Shinde
error: Content is protected !!