तरुण भारत

लस निर्मितीचा मोदींनी घेतला आढावा

देशात 30 लसींचे निर्मितीकार्य विविध टप्प्यांमध्ये : वनस्पतींच्या अर्काद्वारे औषधाची शक्यता शोधण्याचा प्रयत्न

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

Advertisements

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात कोरोना विषाणूवरील लस तयार करण्याच्या प्रयत्नांचा आढावा घेतला आहे. कोरोना लस निर्मिती, औषधाचा शोध, निदान आणि चाचण्यांसंबंधी स्थापन कृतिदलाची बैठक पार पडली आहे. देशात कोरोनाच्या 30 लसींच्या विकासाचे काम विविध टप्प्यांपर्यंत पोहोचले आहे. यातील काही लसींची चाचणी देखील सुरू होणार असल्याचे बैठकीनंतर सांगण्यात आले आहे.

औषधनिर्मितीसाठी 3 कार्ये

1. सध्या उपलब्ध असलेल्या औषधांच्या वापरासंबंधी शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत. या श्रेणीत 4 औषधांची चाचणी केली जात आहे.

2 नवे औषध आणि मॉलिक्यूल तयार केले जात आहे.

3 वनस्पतींचा अर्क आणि उत्पादनांमध्ये अँटी-व्हायरलच्या शक्यता पडताळून पाहिल्या जात आहेत.

आताचा ताळमेळ कायम रहावा

संशोधन क्षेत्राशी संबंधित तज्ञ, उद्योगक्षेत्र तसेच सरकारच्या प्रयत्नांचे चांगले परिणम मिळत असल्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी संतुष्ट असल्याचे दिसून आले आहे.  अशाप्रकारची गतिमानता आणि ताळमेळ दैनंदिन कामातही असावा. संकटकाळात काय शक्य आहे, याचा विचार करण्याची प्रक्रिया वैज्ञानिकांच्या नियमित कामकाजाचा हिस्सा ठरावी असे मोदींनी म्हटले आहे.

संशोधनावर भर

औषधांच्या निर्मितीत कॉम्प्युटर सायन्स, रसायनशास्त्र आणि बायोटेक्नॉलॉजीच्या संशोधकांना एकत्र आणण्याच्या कृतीचे पंतप्रधानांनी कौतुक केले आहे. प्रयोगशाळेत औषधनिर्मिती आणि चाचणीवर हॅकाथॉनचे आयोजन केले जावे. याच्या विजेत्याला पुढील संशोधनासाठी स्टार्ट-अप कंपन्यांमध्ये संधी दिली जावी अशी सूचना पंतप्रधान मोदींनी केली आहे.

स्वतःची ओळख तयार व्हावी

बेसिकपासून ऍप्लाइड सायन्सपर्यंतचे वैज्ञानिक उद्योगक्षेत्रासोबत मिळून काम करत असल्याचे पाहणे सुखद आहे. आम्हाला याचप्रकारे वाटचाल करावी लागणार आहे. विज्ञानाच्या क्षेत्रात अनुयायी होण्याऐवजी जगातील सर्वोत्तम देशांमध्ये सामील होण्याची यातून संधी असल्याचे मोदी म्हणाले.

Related Stories

अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदासाठी आज मतदान

datta jadhav

नरेंद्र मोदींवरील वादग्रस्त पुस्तक मागे : प्रकाश जावडेकर

triratna

उत्तराखंड : 4 जणांचा मृत्यू; 293 नवीन कोरोना रुग्ण

pradnya p

पक्षांमुळे अंबाला एअरबेसवरील राफेल विमानांच्या सुरक्षेला धोका

datta jadhav

EPFO खातेधारकांना दुसऱ्यांदा कोविड ॲडव्हान्सची मुभा

datta jadhav

जम्मू-काश्मीर : तरुणांचे दहशतवादाकडे वळण्याचे प्रमाण घटले

prashant_c
error: Content is protected !!