तरुण भारत

तळीरामांनी ‘घेतली’ 7 लाख लिटर दारू

विद्याधर पिंपळे/कोल्हापूर

तब्बल 40 दिवस घसाला कोरड पडलेल्या, तळीरामांचा सोमवारी अंत झाला. सोमवारी दुपारनंतर शहरातील दारू दुकाने सुरू झाल्याने, ‘सोमरस’ खरेदीसाठी rशहरात लोकांच्या मोठया रांगा लागल्या असल्याचे चित्र दिसत आहे. अवघ्या दोन दिवसात तळीरामांनी सुमारे सात लाख लिटर दारू ‘घेतली’ असल्याचे समजते.

Advertisements

कोरोना संसर्गमुळे देशात सगळीकडे लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या 40 दिवसात जिल्हातील दारू दुकाने,बिअर शॉपी,परमिटरूम हे पूर्णपणे बंद असल्याने, दारूप्रेमींचा जीव तळमळत होता. या काळात चोरटया दारूची विक्रीही मोठया प्रमाणावर झाली असून, दीडशे रूपयाची क्वार्टर पाचशे रूपयाला विकली जात असल्याची चर्चा आहे. पण सोमवारपासून दारू दुकाने सुरू झाल्याने, दारू खरेदीसाटी लोकांची झुंबड उडाली आहे. सकाळपासून उन्हातानात दारू खरेदीसाठी युवकापासून ज्येष्ठांची गर्दी झाली आहे.

शहरात सुमारे 22 दारू दुकाने,80 बिअर शॉपी,व 150 परमिटरूम्स आहेत. यापैकी परमिटरूम्स सोडून इतर दारू दुकाने सोमवारपासून सुरू झाली आहेत. दारू पुन्हा मिळणार की नाही ? याचा स्टॉक होणार असल्याच्या या भितीने नेहमीपेक्षा अधिक, म्हणजे एक -दोन नव्हे तर अंदाजे पाच पटीने या दारूची खरेदी दोन दिवसात मोठया प्रमाणावर झाली आहे. याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागांशी संपर्क साधला असता, लॉकडाऊनमुळे मार्च महीना अखेरच्या दारू विक्रीची आकडेवारी उपलब्ध नसल्याचे सांगण्यात आले. मात्र फेब्रुवारी महिन्यात देशी-9 लाख 66 हजार बल्क लिटर,विदेशी-5 लाख 29 हजार बल्क लिटर, तर बिअरची 6 लाख 60 बल्कलिटर दारूची विक्री झाली असून महीन्याला 22 कोटी रूपयाचा महसूल मिळाला आहे. या दोन दिवसात नेहमीपेक्षा पाच पटीने या दारूची विक्री झाली असल्याचे संबधीता कडून सांगण्यात आले.

जिल्हात सरासरी 70 ते 75 हजार लिटर दारूची सिझननुसार विक्री होत आहे., या दोन दिवसात पाच पटीने म्हणजे दिवसाला साडेतीन लाख लिटर दारू तळीरामांनी ‘घेतली’ असल्याचे समजून आले.

विना परवाना दारू खरेदी

31 डिसेंबर म्हटले की  दारू पिण्याऱयांची मोटी धावपळ सुरू असते. दारू पिणे,दारू साठवणे आदीसाठी हा परवाना दिला जातो. एक दिवसासाठी पाच रूपये, वर्षासाठी शंभर रूपये तर आजन्म परवान्यासाठी एक हजार रूपये मोजावे लागते. यातून शासनाला महसूल मिळत असतो. पण या दोन दिवसात दारू खरेदी करण्याऱया लोकाकडे परवाना आहे की नाही ? याची खात्री न करता दारू विक्री सुरू आहे. यामुळे मोठी गर्दी होऊन, परवाना न घेता नियमापेक्षा जास्त दारू खरेदी झाली आहे.   तर कांहीनी जादा पैसे देऊन, हे दारू परवाने घेतली असल्याची चर्चा आहे.

दारू स्टॉक स्टेटमेंट तपासणीची गरज

प्रत्येक दारू विक्रेत्याला दर महिन्याला आपल्या दारू स्टॉकचे स्टेटमेंट राज्य उत्पादन शुल्क विभागाकडे पाठवले जाते. यातून दारू किती आली व किती विकली याची माहीती मिळत असते. पण या लॉकडाऊन व नंतरच्या स्टॉक स्टेटमेंटची तपासणी होण्याची गरज आहे. कारण बनावट दारूचाही यावेळी सुळसुळाट झाल्याची शक्यता नाकारता येत नाही.

Related Stories

कोल्हापूर : वीज अपघातास विद्युत निरीक्षकही जबाबदार

Abhijeet Shinde

तीन पानी जुगार खेळणारे सातजण ताब्यात

Patil_p

कोल्हापूर : वीजतारांच्या धक्क्याने सासू-सुनेचा दुर्दैवी मृत्यू

Abhijeet Shinde

जिल्हा शल्य चिकित्सकांचे मुख्यालय पुन्हा `सीपीआर’ मध्ये स्थलांतरीत

Abhijeet Shinde

साताऱयात विनाकारण फिरणारे, दुकानदारांवर गुन्हे

Patil_p

कमानी हौद कारंजे बंदच

Patil_p
error: Content is protected !!