तरुण भारत

शहर कोरोनामुक्त करण्यासाठी उपनगराध्यक्षांची प्रयत्नांची पराकाष्ठा

प्रशासनाला घेऊन समनव्यातुन करताहेत काम: ठरू लागलेत हिरो

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

शहरात सात कोरोनाचे रुग्ण होण्यापूर्वीच शहर कसं कोरोनापासून दूर ठेवायचं यासाठी स्वतः लक्ष घालून काम करत होते ते उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी काम केले आणि करत राहिले. दररोज न चुकता पालिकेत जाऊन केलेल्या कामाचा आढावा अधिकाऱयांकडून स्वतः जाणून घेत कुठेही कमी पडू नये. सातारा शहर कोरोनामुक्त कसे राखता येईल यासाठी ते नेत्यांच्या सूचनेनुसार प्रयत्न करत आहेत. त्यामुळे उपनगराध्यक्ष किशोर शिंदे हेच खरे सध्या सातारा शहरात हिरो ठरू लागले आहेत. ज्या भागात कोरोनाचे रुग्ण आढळून आले त्याही भागात स्वतः जाऊन पालिकेकडून निर्जंतुक फवारणी करून घेतली आहे.

  कोरोनाला शहराबाहेरच ठेवण्यासाठी देशाचा लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वीच उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी त्यांच्या केबिनमध्ये अधिकाऱयांची बैठक घेतली होती. त्याच वेळेस जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी खावली येथे क्वारंटाइन कक्ष सुरू करण्याच्या आरोग्य विभागाला सूचना दिल्या होत्या. जसा जसा कोरोनाचा कहर राज्यात वाढत राहिला तसा शहरात कुठे बाधा होऊ नये याकरता स्वतः उपनगराध्यक्ष किशोर शिंदे हे पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनामध्ये आणखी सुधारणा करण्याच्या सूचना देत होते. शहरालगतच्या उपनगरात पहिला रुग्ण आढळून आला तेव्हा त्यालगतच्या परिसरात प्रामुख्याने लक्ष घातले होते. आरोग्य विभागाकडे असलेला औषध पुरवठा योग्य प्रमाणात आहे की नाही याची स्वतः उपनगराध्यक्ष किशोर शिंदे हे गोदामात जाऊन पाहणी करत होते. सातारा विकास आघाडीचे नेते खासदार उदयनराजे भोसले यांच्या सूचनेनुसार उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी शहरासाठी संपूर्ण लक्ष केंद्रीत केले. स्वतः औषध फवारणी करण्यासाठी पुढे होऊन प्रारंभ केला होता. या लॉकडाऊनच्या काळात प्रशासन एक कलमी कार्यक्रम होऊ नये यासाठी स्वतः लक्ष ठेवून आहेत. जेथे प्रशासन चुकते आहे तेथे लगेच ते सूचना देत राहिले. सध्या शहरात सात रुग्ण असलेले परिसरात निर्जंतुक फवारणीची कामे करून घेतली. नागरिकांना येणाऱया अडचणी सोडवण्यासाठी प्रयत्न केला जात आहे.

उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांच्याकडून समनवय

सातारा विकास आघाडीत काही नगरसेवकांना आघाडीत दुफळी निर्माण करायची आहे तर काहींना स्वतःच कसे मोठं आहोत हे नेत्यांसमोर दाखवण्यासाठी सतत विरोधातल्या नगरसेवकांना ही माहिती पुरवून नगराध्यक्षा सौ. कदम यांची कोंडी करायला लावायची. तर कधी मुख्याधिकारी शंकर गोरे यांना हाताशी धरून आपलीच पोळी भाजून घ्यायची. आपल्याच हातात सगळ्या चाव्या आहेत हे दाखवून देणारे सातारा विकास आघाडीत काही जेष्ठ नगरसेवक आहेत. त्यांच्यामुळे अनेकदा होत असलेल्या चांगल्या कामात खोळंबा झाल्याचे सातारकरं नागरिकांनी पाहिले आहे. मात्र, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे यांनी सगळ्यांची सांगड घालून समनव्यातुन मार्ग काढत कोरोनाशी लढा पालिका प्रशासनाने सुरू ठेवला आहे.

प्रत्येक विभागावर नजर यापूर्वी पालिकेत साविआतील एक जेष्ठ नगरसेवक एका पदाधिकाऱयास एक तर दुसऱयास वेगळेच नेत्यांचे नाव सांगून कुरापती लावायचे. आता ही ते होत असल्याची चर्चा आहे. मात्र, उपनगराध्यक्ष किशोर शिंदे हे अशा मंडळींना जेवढय़ास तेवढे ठेवतात. नेत्यांची सूचना अंतिम मानत काम करतात. पालिकेतल्या प्रत्येक विभागावर नजर ठेवून असतात. कारभार चांगला झाला पाहिजे. कोरोनाच्या काळात कुठेही कमीपणाची उणीव भासली नाही पाहिजे याकरता ते प्रयत्नशील असतात.

Related Stories

मुख्यमंत्र्यांच्या खांद्यावर दोन नास्तिक भुते- चंद्रकांत पाटील

Abhijeet Shinde

सांगलीत नव्या दहा कोरोना रुग्णांची भर

Abhijeet Shinde

कराडतील दोन्ही खून अनैतिक संबंधातूनच

Patil_p

सोलापूर : कोरोनाकाळात गोरगरिबांच्या पोटावर पाय,रेशन तांदळाचा काळाबाजार उघड

Abhijeet Shinde

कार्ड लिमिट वाढवतो सांगून 1.79 लाखाची फसवणूक

Patil_p

मुख्यमंत्री ठाकरे अद्याप रुग्णालयातच

datta jadhav
error: Content is protected !!