तरुण भारत

रस्त्यांचा दर्जा राखण्यासाठी उपाययोजना

प्रतिनिधी/ बेळगाव

स्मार्ट सिटी योजनेंतर्गत विविध रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात आले आहे. ऊन-पाऊस व वाहनांच्या फेऱयांमुळे या रस्त्यांचे प्रसरण होऊ नये, याकरिता रस्ता कटींग करून त्यामध्ये बिटूमीन काँक्रीट व डांबर घालण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. शहराच्या विविध भागात हे काम सध्या सुरू आहे.

Advertisements

शहरातील रस्ते खराब झाल्याने वारंवार दुरुस्तीचे काम हाती घ्यावे लागते. दरवषी पावसाळय़ात रस्ते खराब होत असल्याने दुरुस्तीसाठी मोठय़ा प्रमाणात निधी खर्च करावा लागतो. त्यामुळे या समस्येपासून मुक्त होण्यासाठी शहर व उपनगरांतील प्रमुख रस्त्यांचे काँक्रिटीकरण करण्यात येत आहे. बहुतांश रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. काही रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू आहे. काँक्रिटीकरण पूर्ण झालेल्या रस्त्यांवर वाहनांच्या फेऱयांमुळे आणि ऊन-पावसामुळे रस्ता प्रसरण पावतो. त्यामुळे रस्ता खराब होण्याची शक्मयता असते. हे टाळण्यासाठी काँक्रिटीकरण करण्यात आलेल्या रस्त्यावर कटरने चरी मारून त्यामध्ये बिटुमीन काँक्रीट आणि डांबर भरण्यात येत आहे. रस्त्याचा दर्जा राखण्यासाठी हे काम सध्या ठिकठिकाणी सुरू आहे. 

Related Stories

बेंगळूर-जयपूर व्हाया बेळगाव धावणार रेल्वेची पार्सल एक्स्प्रेस

Patil_p

खानापूर तालुक्यात रविवारी 11 कोरोनाबाधितांची भर

Rohan_P

चोर समजून केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू

Patil_p

न्यायालयासमोरील रस्त्यावर वकिलांचा रास्तारोको

Rohan_P

बेंगळूर: सिद्धरामय्या यांची प्रकृती स्थिर

triratna

अपहरण करुन अल्पवयीन मुलीवर बलात्कार

Rohan_P
error: Content is protected !!