तरुण भारत

रेल्वेच्या पार्सल एक्सप्रेस रेलगाडीला चांगला प्रतिसाद

प्रतिनिधी / वास्को

दक्षिण पश्चिम रेल्वेने दक्षिण पश्चिम रेल मार्गावर सुरू केलेल्या पार्सल रेल्वे सेवेला चांगला प्रतिसाद मिळत आहे. या सेवेअंतर्गंत वास्को रेल्वे स्थानकातून सुटलेल्या दोन रेलगाडय़ांनी फेऱया पूर्ण केल्या आहेत. या पार्सल सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे उद्योजक, संस्था व नागरिकांना केले आहे. वास्को द गामा शालीमार पार्सल एक्सप्रेसने आतापर्यंत जवळपास 81 टन मालाची वाहतुक केली. अत्यावश्यक व जीवनावश्यक अशा मालाची या पार्सल एक्सप्रेसमधून वाहतुक करण्यात येत असून या सुविधेला चांगला प्रतिसाद मिळू लागला आहे. स्थानिक उद्योग, ई कॉमर्स कंपनीज् तसेच संस्था व व्यक्तींनी रेल्वेच्या या सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन रेल्वे केले आहे. लोकडाऊनच्या काळात देशभर जीवनावश्यक वस्तू पुरवण्याच्या हेतूने ही सेवा सुरू करण्यात आलेली आहे. दक्षिण पश्चिम रेल्वेच्या हुबळी विभागाहून शालीमार पार्सल एक्सप्रेस ट्रेनव्दारे हुबळी विभातून जवळपास 81 टन मालाची वाहतुक करण्यात आली. वास्को द गामा स्थानकात दंतमंजनसह सॅनिटर नॅपकीन व इतर  साहित्य मिळून 75 टन साहित्य पार्सल ट्रेनमध्ये लोढ करण्यात आले. कोप्पल आणि हॉस्पेट येथून कित्येक टन मासळी या ट्रेनमध्ये लोढ करण्यात आली. या पार्सल ट्रेनमधून जीवनावश्यक साहित्य पाठवण्यासाठी कोणत्याही मर्यादीत वजनाची अट नाही. कमीत कमी साहित्यही यासेवेव्दारे पाठवले जाऊ शकते असे दक्षिण पश्चिम रेल्वेने म्हटले आहे.

Advertisements

Related Stories

दूध उत्पादकानांही मिळणार किसान क्रेडिट कार्डचा लाभ

Omkar B

जलप्रलयात हजाराहून अधिक घरे कोसळली

Omkar B

पणजीचे फेस्त साधेपणाने

Patil_p

कुडचडेत 26 रोजी श्री गणेश दर्शन स्पर्धा

Amit Kulkarni

कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी शंभर टक्के लसीकरण हाच पर्याय- मंत्री माविन गुदिन्हो

Amit Kulkarni

उत्तर गोवा जिल्हाधिकाऱयांकडून पत्रादेवी चेक नाक्मयाची पाहणी

Omkar B
error: Content is protected !!