तरुण भारत

गँगस्टर अरुण गवळीच्या मुलीचे अभिनेता अक्षय वाघमारे सोबत उद्या होणार लग्न

मुंबई / प्रतिनिधी

गँगस्टर अरुण गवळी यांची मुलगी योगिता व मराठी अभिनेता अक्षय वाघमारे उद्या (८ मे) रोजी लग्नगाठ बांधणार आहेत. २९ मार्च रोजी या दोघांचा विवाहसोहळा पार पडणार होता. मात्र लॉकडाउनमुळे लग्न होऊ शकलं नाही. आता मुंबई आणि पुणे पोलिसांची विशेष परवानगी घेऊन हे दोघं उद्या विवाहबद्ध होणार आहेत. मुंबईतल्या दगडी चाळीतच हा विवाहसोहळा पार पडणार आहे. गुरुवारी हळदीचा कार्यक्रम पार पडणार असून शुक्रवारी संध्याकाळी लग्न होणार आहे. या लग्नाला अरुण गवळीसुद्धा उपस्थित राहणार आहे. या लग्नसोहळ्यात सोशल डिस्टन्सिंगचे नियम काटेकोरपणे पाळले जातील, असंही अक्षयने सांगितलं. सॅनिटायझर आणि फेस मास्क उपस्थितांना दिले जातील. योग्य वेळी धूमधडाक्यात रिसेप्शनचं आयोजन केलं जाईल अशीही माहिती त्याने दिली.

Advertisements

Related Stories

लॉकडाऊन नतंर शाहूवाडी विभागाचे निर्भया पथक कार्यरत : सर्वत्र गस्त सुरू

Abhijeet Shinde

स्वच्छ सर्वेक्षण 2020 मध्ये कराड देशात अव्वल

Patil_p

गांधीजींच्या विचाराशिवाय राष्ट्रसुधारणा नाही

Abhijeet Shinde

केशरी शिधापत्रिकाधारकांनाही त्वरीत धान्य द्या – खासदार मंडलिक यांची मागणी

Abhijeet Shinde

सेंकड लीड ‘सहकारमंत्री विरूद्ध उंडाळकर’ अटळ

Patil_p

कोल्हापूर खंडपीठ : पंधरा दिवसात केंद्रीय कायदे मंत्र्यासोबत बैठक – नारायण राणे

Sumit Tambekar
error: Content is protected !!