तरुण भारत

ई – पासची सोय गायब; तातडीच्या कामासाठी पर्याय संपल्याने नागरीकांमध्ये नाराजी


जिल्हाधिकारी यांच्याकडे ई – पासचा परवाना ठरतोय कुचकामी
वारणानगर / प्रतिनिधी


राज्यात पोलीस उपायुक्त, पोलीस अधिक्षक यांच्या स्तरावर लॉकडाऊन काळात नागरिकांची गरज लक्षात घेवून तातडीने देण्यात येणाऱ्या ई पासची सोयच या सप्ताहात गायब झाल्याने तातडीच्या कामासाठी पर्याय संपल्याने नागरिकात नाराजी पसरली आहे. कोविड १९ एमच पोलीस या वेबसाईडवर तातडीच्या कामासाठी ऑनलाईन प्रवास परवाना मागणी केल्यावर खात्री करून हा ई – पास दिला जात होता.यामध्ये एखाद्या जवळच्या नातेवाईकाचे निधन झालेवर, हॉस्पीटल येथे उपचारासाठी,पत्रकार यासह अन्य अत्यावशक सेवेतील घटकांना या पासचा वापर करून महत्वाची कामे पार पाडता येत होती.

राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या आदेशान्वये कायदा व सुव्यवस्था विभागाचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलींद भारंबे यानी दि. ४ एप्रिल रोजी कोरोणा विषाणू प्रसारण प्रतिबंधात्मक उपाय म्हणून राज्यात एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणेसाठी काढलेल्या शुद्धी पत्रक राज्यातील सर्व पोलीस आयुक्त व पोलीस अधिक्षक यांना पाठवणेत आले आहे. जिल्हा स्तरावर प्रवासासाठी पोलीस उपायुक्त व पोलीस अधिक्षक यांच्या स्तरावर परवाना मिळेल, राज्याअतंर्गत प्रवासासाठी पोलीस महासंचालक यांच्या स्तरावर परवाना मिळेल.

माल वहातुक करणाऱ्या वहानांना माल वहातुक करण्याची परवानगी असून त्यांना कोणत्याही प्रकारचा अटकाव करू नये तसेच अशा वहान चालकानी परवानगी घेण्याची गरज नाही अशा स्पष्ट शब्दात विशेष महानिरीक्षक मिलींद भारंबे यानी काढलेल्या आदेशात नमूद केले आहे.
या आदेशाला धरून अत्यावशक कामासाठी पोलीस अधिक्षक स्तरावर तातडीचा ई – पास मिळत होता या सप्ताहात ही सुविधाच गायब झाल्याने नागरिकांची तसेच अत्यावशक सेवेत असणाऱ्या घटकांची मोठी पंचाईत झाली आहे.

ई – पास साठी जिल्हाधिकारी स्तरावर नवीन सुधारीत प्रणाली सुरु झाली आहे तथापी ही सुविधा स्थलातंरीत होणाऱ्या विद्यार्थी, कामगार यांच्यासाठी सोयीची आहे परंतु तातडीच्या व अत्यावशक सेवेत काम करणाऱ्या घटकांना या नवीन प्रणालीचा काहीच उपयोग होत नाही नवीन प्रणालीत, पर्यटक, यात्रेकरू,कामगार,इतर एवढेच पर्याय आहेत याशिवाय पत्रकार, हॉस्पीटल मधील उपचार,नातेवाईकाचे निधन आणि अत्यावशक सेवा हे पर्याय नवीन पासच्या प्रणालीत येत नसल्याने सुधारीत पध्दत असून खोळंबा नसून अडचण अशी झाली आहे.या असुविधेने नागरिकांना महत्वाच्या वेळेला जाता येत नसल्याने मोठ्या प्रमाणावर नाराजी आहे.

जिल्हा अतंर्गत प्रवास करायचा असल्यास दोन्ही स्वतंत्र जिल्हाधिकारी स्वरावर परवानगी मागणी करावी लागते नवीन निर्माण केलेल्या वेबसाईटवर वेळीच प्रतिसाद मिळत नसल्याने प्रवासाचा परवाना मिळल किंवा नाही याचे कोणतेही उत्तर लगेच उपलब्ध होत नाही एका जिल्ह्यात परवाना मिळाला तर दुसऱ्या जिल्ह्यात मिळेल किंवा नाही याची शास्वती नसल्याने नागरिकात नाराजी असून तातडीच्या कामासाठी पूर्वी प्रमाणेच पोलीस दलाच्या वेबसाईट वरुन ई -.पासचा परवाना मिळावा अशी मागणी होत आहे.

Related Stories

सोलापूर ग्रामीणमध्ये तब्बल २६० कोरोना पॉझिटीव्ह

Shankar_P

उद्योजक राजेंद्र कवडे यांचे निधन

triratna

सरकारने शेतकऱयांना विश्वासात घ्यावे : राजू शेट्टी

triratna

आयपीएलच्या धर्तीवर रंगणार कुस्ती दंगल !

Shankar_P

महाराष्ट्रातील मंदिरे खुली करण्यासाठी भाजपचे राज्यव्यापी आंदोलन

pradnya p

खोतवाडीत परप्रांतियांची ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांवर दगडफेक

triratna
error: Content is protected !!