तरुण भारत

‘त्या’ युवकावर अखेर गुन्हा दाखल

शिक्का मारणारा कर्मचारी आणि अधिकारी यांना वगळले

दापोली/प्रतिनिधी

Advertisements

कोरोना चा रिपोर्ट येण्याच्या आधीच दापोली शहर व काळकाई कोंड परिसरात फिरलेल्या युवकावर अखेर प्रशासनाने दापोली पोलिस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे. मात्र उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी सूतोवाच करून देखील दोषी कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल न केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. शिवाय दापोलीकरांना मनःस्ताप भोगायला लावणाऱ्या या बेजबाबदार कर्मचाऱ्यांबद्दल दापोलीत तीव्र संताप व्यक्त होत आहे.

दापोली तालुक्यातील शिर्दे मुळगाव असणारा युवक 27 जणांबरोबर मुंबईतून 28 मे रोजी चालत आला होता. या नंतर त्याला क्वारंटाईन करून शहरातील ए. जी. हायस्कूल येथे ठेवण्यात आले होते. त्याचा अहवाल 5 मे रोजी दापोली दाखल झाला. मात्र त्या आधी एक दिवस त्याला आरोग्य कर्मचारी यांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आदेशाने हातावर होम क्वारंटाईनचा शिक्का मारून घरी पाठवल्याचे पाठवले होते यानंतर हा युवक दापोली शहर व काळकाई कोंड परिसरात फिरला यानंतर त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर त्याला शोधून पुन्हा ए. जी. हायस्कूल येथे विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले या गोष्टीचा बभ्रा झाल्यानंतर पत्रकारांशी बोलताना उपविभागीय अधिकारी शरद पवार यांनी सदर कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात येईल असे स्पष्ट केले होते मात्र प्रशासनाने केवळ या युवकावर गुन्हा दाखल केला आहे. शिवाय ज्या कर्मचार्‍याने या युवकाच्या हातावर शिक्का मारून त्याला घरी पाठवले या कर्मचाऱ्यावर कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही. यात फिर्यादीत आपण वैद्यकीय अधिकारी यांच्या आदेशाने सदर युवकाच्या हातावर होम होम क्वारंटाईनचा शिक्का मारून त्याला घरी पाठवण्याचे म्हटले आहे. यामुळे आता प्रशासन यांच्यावर कधी गुन्हा दाखल करणार याची दापोलीकरांना प्रतीक्षा आहे.

Related Stories

बंद पडलेल्या ऑक्सिमिटर व टेम्प्रेचर गनने केला सर्वे

Amit Kulkarni

शिवसेना संपेल, पण रिफायनरी होणारच!

Patil_p

सिंधुदूर्ग, ठाणेही ‘बालविवाह’च्या फेऱयात!

Patil_p

‘उमेद’ ला बांधू नका कंत्राटदारांच्या दावणीला

Patil_p

‘कोरोना’ वॉर्ड तयार, सुविधांची प्रतीक्षा

NIKHIL_N

सजगता ही देशाच्या सुरक्षिततेची भिंत!

NIKHIL_N
error: Content is protected !!