तरुण भारत

गांधीनगरमध्ये ३५ हजारांचा गुटखा जप्त

वार्ताहर / उचगांव

गांधीनगर बाजारपेठेतील एका ट्रान्सपोर्टच्या मागे आलेल्या तिघा जणांकडून दुचाकीसह ३४ हजार ५०० रुपयांचा गुटखा गांधीनगर पोलिसांनी जप्त केला. अमित सुरेशलाल अहुजा, रा. मोहिते मळा, गांधीनगर, प्रकाश मूलचंद निरंकारी रा. शिरू चौक, गांधीनगर व दीपक परशुराम चावला रा. भाजी मंडई, गांधीनगर अशी तिघांची नावे असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Advertisements

हे तिघे गांधीनगर बाजारपेठेतील एका ट्रान्सपोर्टच्या मागे दुचाकी एम एच 09- एफडी 705वर गुटख्याचा साठा विक्रीसाठी घेऊन थांबले होते. याबाबतची माहिती गांधीनगर पोलीस ठाण्यास मिळाली. त्यानुसार हिरा पान मसाला, सुगंधी तंबाखू पत्ती व दुचाकीसह ३४ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. याबाबतची फिर्याद पोलीस नाईक आकाश संभाजी पाटील यांनी गांधीनगर पोलीस ठाण्यात दिली असून या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related Stories

मायक्रो फायनान्स कंपनीच्या दमदाटी विरोधात महिलांचा मोर्चा

Abhijeet Shinde

कोरोना काळात पुरोगामी शिक्षक संघटनेने जपले सामाजिक भान : शिक्षण समिती सभापती

Abhijeet Shinde

आई जेऊ घालेना… बाप थारा देईना

Abhijeet Shinde

महाराष्ट्राला औषधांचा पुरवठा केल्यास तात्काळ कारवाई करु; मंत्री नवाब मलिक यांचा दावा

Rohan_P

कोल्हापूर जिल्ह्यात ८७ गावात कोरोनाला ‘नो एंट्री’!

Abhijeet Shinde

‘तात्यांचा ठोकळा’चे शाहू महाराजांच्या हस्ते प्रकाशन

Abhijeet Shinde
error: Content is protected !!