तरुण भारत

आंध्रमध्ये वायू गळती, 11 बळी

वृत्तसंस्था/विशाखापट्टणम :

विशाखापट्टणम येथील आरआर व्यंकटपुरम भागात विशाखा एलजी पॉलिमर ही कंपनी आहे. गुरुवारी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास या कंपनीत वायू गळतीला सुरुवात झाली. त्यानंतर कंपनीतील अधिकारी-कर्मचाऱयांसह सर्वांचीच धावपळ सुरू झाली. या वायू गळतीची झळ आजुबाजुच्या परिसरालाही बसली. स्थानिक प्रशासन आणि नौदलाच्या मदतीने कारखाना परिसरातील सर्व गावे तातडीने रिकामी करण्यात आली. काही बाधितांची प्रकृती गंभीर असून तब्येत बिघडणाऱयांसाठी वेगवेगळय़ा रुग्णालयांमध्ये दोन हजार बेड्स सज्ज ठेवण्यात आले आहेत.

Advertisements

>?ॉकडाऊन’?ुळे एलजी पॉलिमर ही कंपनी गेले काही दिवस बंद होती. सरकारने औद्योगिक विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने उद्योगधंदे सुरू करण्याचा निर्णय घेतल्यानंतर अलिकडेच ही कंपनी सुरू करण्यात आली होती. मागील काही दिवस कंपनी बंद राहिल्याने यंत्रसामुग्रीत बिघाड होऊन हा वायू गळतीचा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला.

तपासासाठी पाच सदस्यीय समिती

दरम्यान, आंध्रप्रदेश सरकारतर्फे या दुर्घटनेच्या चौकशीसाठी पाच सदस्यीय तपास समिती नेमण्याची घोषणा केली आहे. या समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर दुर्घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.

लोक जागच्या जागी कोसळले…

एलजी पॉलिमर कंपनीतील वायू गळतीचा वेग प्रचंड असल्याचे दिसून येत होते. या विषारी वायूमुळे लोक रस्त्यावर किंवा असलेल्या ठिकाणीच खाली कोसळल्याचे प्रकार काही ठिकाणी निदर्शनास येत होते. कोरोनाच्या संसर्गातच हा वेगळा प्रकार घडत असल्याने लोकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते. मात्र, वायू गळतीची कल्पना येताच परिसरातील पाच हजारहून अधिक लोकांना हलविण्यात आले. तसेच प्रकृती बिघडलेल्या 300 हून अधिक लोकांना इस्पितळांमध्ये दाखल केले आहे. बाधितांमध्ये विशेषतः लहान मुले आणि वृद्धांचा समावेश आहे.

एनडीआरएफचे मदतकार्य

दुर्घटनेची तीव्रता मोठी असल्याने कंपनीच्या अधिकाऱयांनी एनडीआरएफला पाचारण केले. वायू गळती रोखण्यासाठी आणि बचावकार्यासाठी या पथकाने बरीच धावाधाव केली. कंपनीच्या परिसरातून 500 लोकांना बाहेर काढण्यात आले. तसेच आजुबाजुच्या गावांमध्ये घरोघरी जाऊन शोधमोहीम हाती घेतली.

मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक कोटी

जगनमोहन यांनी रुग्णालयांमध्ये जात बाधितांच्या प्रकृतीची विचारपूसही केली. त्यांनी मृतांच्या वारसांना प्रत्येकी एक-एक कोटी रुपये मदत देण्याचे जाहीर केले. तसेच अन्य बाधितांना 10-10 लाख रुपये आणि डिस्चार्ज मिळालेल्यांना प्रत्येकी एक लाख रुपये देण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

Related Stories

केजरीवाल सरकारने घेतला ‘हा’ निर्णय

Rohan_P

अरुणाचल सीमेनजीक चीनने वसविली तीन गावे

Patil_p

अनुपमा परमेश्वरन बिहार टीईटीत उत्तीर्ण

Patil_p

काळानुरुप ‘युद्ध’स्वरुपात बदल!

Patil_p

कोरोनावर ‘फेविपिरावीर’ औषधाला परवानगी

Patil_p

दिल्लीच्या परिस्थितीत सुधारणा; सोमवारी आढळले केवळ 65 नवे कोरोना रुग्ण

Rohan_P
error: Content is protected !!