तरुण भारत

शेकडो स्थलांतरित कामगार अडकले कर्नाटकाच्या सीमेवर

सेवासिंधू ऍप’वर वैध नोंदीची आवश्यकता, रेड झोनमधून येणाऱयांचा ओघ वाढता

प्रतिनिधी / बेळगाव

वेगवेगळय़ा राज्यातून स्वगृही परतण्याची आस मनात बाळगून कर्नाटकाकडे येणारे स्थलांतरित कामगार सीमेवर अडकले आहेत. कर्नाटकाने कायदेशीर प्रक्रिया अपूर्ण असल्याचे सांगून त्यांना सीमेवरच रोखले असून त्यामुळे यामधील अनेकांना नाईलाजास्तव परत जावे लागत आहे.

महाराष्ट्र व गोव्याच्या सीमेवरील बेळगावात प्रवेश करण्यासाठी पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कोगनोळी, कागवाड व चोर्ला ही तीन प्रवेशद्वारे निश्चित करण्यात आली आहेत. सध्या प्रशासनाने कागवाडमधील वाहतूक बंद ठेवली असून कोणत्याही राज्यातून बेळगावात येणाऱयांसाठी कोगनोळी तपास नाक्मयावर काटेकोरपणे तपासणी करण्यात येत आहे.

बुधवारी गुजरात, उत्तरप्रदेश, मुंबई, मध्यप्रदेश, राजस्थानहून कर्नाटकातील वेगवेगळय़ा जिल्हय़ात परतण्यासाठी त्या त्या राज्यांची परवानगी घेऊन आलेल्या सुमारे 300 स्थलांतरितांना कोगनोळी तपासनाक्मयावरच अडविण्यात आले. यावेळी स्थलांतरित व पोलीस अधिकारी यांच्यात वादावादीचा प्रसंगही घडला आहे.

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी डॉ. एस. बी. बोम्मनहळ्ळी व जिल्हा पोलीसप्रमुख लक्ष्मण निंबरगी यांनी बुधवारी चोर्ला व कोगनोळी तपासनाक्मयांना भेटी देऊन तेथील व्यवस्थेची पाहणी केली आहे. परराज्यातून बेळगावमार्गे कर्नाटकात प्रवेश करणाऱयांसाठी नियमांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची सूचना तेथील अधिकाऱयांना देण्यात आली आहे.

गुरुवारी दिवसभरही कोगनोळी तपासनाक्मयावर स्थलांतरित कामगार अडकून पडले होते. गुजरात, राजस्थान, मध्यप्रदेश व महाराष्ट्र आदी सरकारांनी आम्हाला आमच्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. असे असूनही सीमेवर का अडविले जात आहे? असा संतप्त सवाल हे कामगार करीत आहेत. नियमांचे व्यवस्थित पालन झाले नाही. याबरोबरच रेड झोनमधून येणाऱयांची संख्या अधिक आहे. त्यामुळे खबरदारी घेण्यात येत असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कर्नाटकाने आंतरजिल्हा व आंतरराज्य वाहतुकीसाठी सेवासिंधू ऍपचा पर्याय सुचविला आहे. ज्यांना आपल्या गावी परतायचे आहे त्यांनी या ऍपद्वारे नावे नोंदणी करून प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर त्यांना वैध ठरवून परवानगी दिली जाते. मात्र, या प्रक्रियेतून न जाता रेड झोनमधून त्या त्या प्रशासनाची परवानगी घेऊन येणाऱयांची संख्या वाढली आहे. त्यांना सहजपणे कसा प्रवेश देता येईल? असा प्रश्न सरकारी अधिकाऱयांनी उपस्थित केला आहे.

कर्नाटक व शेजारील राज्यांच्या सरकारी घोळामुळे कोरोना महामारीच्या संकटाच्या काळातही स्थलांतरित कामगार, भाविक व पर्यटक सीमेवर अडकून पडले आहेत. कोगनोळी तपास नाक्मयांवरून तर तुम्ही परत जा, अशी स्पष्ट सूचना देऊन त्यांना माघारी धाडण्याचे प्रकार घडले आहेत. त्यामुळे स्थलांतरितांचे प्रश्न गंभीर बनत चालले आहेत.

Related Stories

‘हॅप्पी न्यू इयर’ आणि नंबर 1 वर बियर!

Patil_p

खडेबाजारमध्ये दोन वर्षांपासून जलवाहिनीला गळती

Patil_p

विद्यार्थ्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी

Patil_p

हरणाची शिकार करणाऱया दोघांना जामीन

Patil_p

जिल्हा मध्यवर्ती बँकेची आज निवडणूक

Patil_p

सिमेंट व्यावसायिकांचा एक दिवसाचा बंद यशस्वी

tarunbharat
error: Content is protected !!