तरुण भारत

जगभरातील कोरोनाबळींची संख्या 2 लाख 70 हजारांवर

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

  जगभरात आतापर्यंत 39 लाख 17 हजार 531 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 2 लाख 70 हजार 720 जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 13 लाख 44 हजार 120 रुग्ण या आजारातून बरे झाले असून, अजूनही 23 लाख 02 हजार 691 ॲक्टिव्ह केसेस आहेत. त्यामधील 48 हजार 958 केसेस गंभीर आहेत. वल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 12 लाख 92 हजार 623 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 76 हजार 928 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. स्पेनमध्ये 2 लाख 56 हजार 855 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 26 हजार 070 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

इटलीत आतापर्यंत 2 लाख 15 हजार 858 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 29 हजार 958 जण दगावले आहेत. अमेरिकेनंतर इटलीतील मृतांची संख्या जगात दुसऱ्या क्रमांकावर आहे.

भारतातही 56 हजार 351 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 1889 रुग्ण दगावले आहेत. तर 16 हजार 776 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, 37 हजार 686 ॲक्टिव्ह केसेस आहेत.

Related Stories

महाराष्ट्रात 3,537 नवीन कोरोनाबाधित; 70 मृत्यू

pradnya p

‘या’ सहा राज्यांतून महाराष्ट्रात येण्यासाठी RT-PCR चाचणी बंधनकारक

pradnya p

सांगली : कवठेपिरान येथे युवकाचा खून

triratna

झोपेतून जागे व्हा आणि कोरोना समस्यांचा सामना करा – केंद्राला आयएमएने सुनावलं

triratna

हरियाणामध्ये आता ‘या’ दिवशी असणार लॉकडाऊन

pradnya p

सचिन वाझे यांची क्राईम ब्रान्चमधून बदली करणार : गृहमंत्री

pradnya p
error: Content is protected !!