तरुण भारत

औषध विक्रेत्यांना विमा सुविधेचा लाभ मिळणे गरजेचे – आमदार आबिटकर

वार्ताहर / पिंपळगाव  

महाराष्ट्र राज्यातील औषध विक्रेते व औषध कर्मचारी यांच्या आरोग्याच्यादृष्टीने राज्य सरकारकडून जीवन विमा सारख्या सुविधेचा लाभ त्यांना करून द्यावा अशी मागणी राधानगरी -भुदरगडचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

Advertisements

कोरोना व्हायरस प्रादुर्भाव रोखण्यासाठी आरोग्य यंत्रणा, पोलीस प्रशासन आपला जीव धोक्यात घालून महत्वपूर्ण कामगिरी बजावत आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून या सर्वांना विमा योजनेची सुविधा देण्यात आली आहे. हा निर्णय अतिशय चांगला असून कर्मचाऱ्यांच्या हिताचा आहे. लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून पोलीस व आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत महाराष्ट्र राज्यातील ७० हजारांहून अधिक खासगी औषध व्यावसायिक, लाखो कर्मचारी वर्ग व औषध वितरक त्यांच्या खांद्यास खांदा लावून आपले कर्तव्य उत्तम प्रकारे पार पाडत आहेत.

नेहमीच सार्वजनिक आरोग्याचा एक महत्त्वाचा दुवा असलेले औषध व्यावसायिक आपली जबाबदारी शांतपणे पार पाडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील सुमारे ३ हजारांहून अधिक औषध व्यावसायिक आणि कर्मचारी वर्ग लोकांना आपली सेवा अखंडीतपणे देत आहेत. त्यामुळे अत्यावश्यक सेवा प्रतिनिधी म्हणून त्यांना देखील शासनाकडून जाहीर झालेल्या सेवा सवलती विशेषतः जीवन विमा यासारखी सुविधा मिळणे गरजेचे असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

Related Stories

अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा भाऊ इकबाल कासकर NCB च्या ताब्यात

Rohan_P

पुणे शहरात आज 282 नवे कोरोना रूग्ण, 112 डिस्चार्ज!

Rohan_P

कोल्हापूर : अपघातात जखमी झालेल्या अध्यापिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू

triratna

दोन कैदी आणि एक कोरेगाव तालुक्यातील झाले कोरोनामुक्त

Patil_p

राज्यातील अंगणवाडी सेविकांनी १ लाख मोबाईल सरकारला परत करण्याचा घेतला निर्णय

triratna

महाराष्ट्रात 5,860 रुग्ण कोरोनामुक्त; रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.79%

Rohan_P
error: Content is protected !!