तरुण भारत

खरीप आपत्कालीन पीक आराखडा तयार

खरीप आढावा बैठक, विविध पीक पेरणी काळ निश्चित : जिल्हा कृषी अधिकाऱयांची माहिती

प्रतिनिधी/कोल्हापूर

Advertisements

खरीप हंगामात कृषी विद्यापीठाने आपत्कालीन पीक नियोजन आराखडा तयार केला आहे. त्यानुसार मेच्या तिसऱया ते जूनच्या पहिल्या आठवडय़ात भात पिकाचा सर्वसाधारण पेरणी कालावधी आहे. जिरायत पिकांसाठी जूनचा पहिला ते जुलैच्या दुसऱया आठवडय़ात नागली, जूनचा पहिला ते जुलैचा पहिला आठवडा सोयाबीन पेरणी, जूनचा दुसरा ते जुलैचा पहिला आठवडा ज्वारी पेरणी तर जूनचा दुसरा ते जुलैचा पहिला आठवडा भुईमूग पेरणी करावी, असे आवाहन जिल्हा कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

  वाकुरे म्हणाले, खरीपातील जिरायत पिकांसाठी जूनचा पहिला ते जुलैच्या दुसऱया आठवडय़ात नागली, जूनचा पहिला ते जुलैचा पहिला आठवडा सोयाबीन, जूनचा दुसरा ते जुलैचा पहिला आठवडा ज्वारी तर जूनचा दुसरा ते जुलैचा पहिला आठवडा या काळात भुईमूग पेरणी करावी. बागायत पिकांसाठी मे चौथा ते जुलैचा पहिला आठवडा सोयाबीन पेरणी कालावधी, जूनचा दुसरा त जुलैचा पहिला आठवडा ज्वारीचा पेरणी कालावधी आणि मेचा तिसरा ते जूनचा पहिला आठवडा भातासाठी पेरणी कालावधी निश्चित केला आहे. सोयाबीनची सर्वसाधारण उगवण क्षमता 70 टक्के गृहित धरून प्रति एकरी 30 किलो बियाणे प्रमाण असते. तथापि बियाणे संचालकांच्या सूचनेनुसार सोयाबीनची उगवण क्षमता 65 टक्के धरून प्रति एकरी बियाणे प्रमाण वाढवण्याची सूचना केल्याचे त्यांनी सांगितले.

लॉकडाऊनमध्ये शेतकऱयांना खते उपलब्ध व्हावीत

लॉकडाऊन काळात शेतकऱयांना रासायनिक खते वेळीच उपलब्ध व्हावीत यासाठी जिह्यात खत पुरवठा नियोजन सुरळीत केले आहे. शेती व शेतीपूरक कामे शेतकऱयांनी वेळीच करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी ज्ञानदेव वाकुरे यांनी केले आहे.

 शेती, शेतीपूरक कामांमध्ये शेतीची मशागत, लागवड, पीक, फळझाडांच्या आंतरमशागतीची कामे, फळझाडे व अन्य पिकांची काढणी व विक्री करण्यास कोणतेही निर्बंध नाहीत. शेतीसाठी आवश्यक बी-बियाणे, खते, किटकनाशकांच्या उपलब्धतेसाठी जिह्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे सुरू ठेवली आहेत. शेतीची औजारे, मशिनरीची दुकाने सुरू ठेवण्याच्य, स्पेअर पार्टस व विक्री पश्चात सेवेच्या सूचना दिल्या आहेत.

 ग्रामीण भागात गरजूंना रोजगारासाठी ‘मनरेगा’ अंतर्गत कृषी विभागाशी संबंधित कामे हाती घेण्यात येत आहेत. यामध्ये व्हर्मी कंपोस्ट, नाडेप  उभारणी, शेततळे खोदणे व फळबाग लागवडीच्या पूर्वतयारीची कामे सुरू केल्याचे त्यांनी सांगितले.

Related Stories

राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या परीक्षा आता १० जूनपासून

triratna

कोल्हापूर : अपघातात जखमी झालेल्या अध्यापिकेचा उपचारा दरम्यान मृत्यू

triratna

निवडणूक बिनविरोध केल्यास पंधरा लाखांचा जादा निधी देणार : मनिषा कुरणे

triratna

मराठा समाजाला न्याय्यहक्क मिळाला पाहिजे

triratna

कोल्हापूर जिल्ह्यात दिवसभरात २७८ जण कोरोना पॉझिटिव्ह

triratna

नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केली भाजी मंडईची पाहणी

Patil_p
error: Content is protected !!