तरुण भारत

इटालियन फुटबॉल हंगाम पुन्हा अडचणीत

वृत्तसंस्था / रोम

कोराना महामारी संकटामुळे आता इटलीतील फुटबॉल हंगाम पुन्हा अडचणीत आला आहे. इटलीमध्ये कोरानाची बाधा झालेले रूग्ण पुन्हा नव्याने आढळले असून त्यामध्ये काही फुटबॉलपटूंचाही समावेश आहे. इटलीतील शास्त्रज्ञ आणि फुटबॉलचे वरिष्ठ अधिकारी यांच्यात बैठक झाली असून या बैठकीत देशातील फुटबॉल हंगाम कोरोनापासून कसा वाचविता येईल याचे प्रयत्न केले जाणार आहेत. पण सिरी ए फुटबॉल स्पर्धेचे भवितव्य मात्र अधांतरी असल्याचे जाणवते.

Advertisements

इटलीमध्ये कोरोना महामारीत आतापर्यंत किमान 30 हजार लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे 2 लाखापेक्षा अधिक लोकांना याची बाधा झाली आहे. इटलीत आता कोरोनाचा प्रसार दुसऱयांदा होत असून त्यामध्ये  500 लोकांचे बळी गेले आहेत.कोव्हिड- 19 चा प्रसार दुसऱयांदा सुरू असून आणखी 30 हजार लोकांना याची लागण झाली आहे. कोरोना चाचणीमध्ये इटलीतील काही फुटबॉलपटूंना लाग ण झाल्याचे आढळून आले आहे.  इटलीत परत आल्यानंतर पोर्तुगालच्या रोनाल्डोला 14 दिवसासाठी क्वेरेनटाईनमध्ये ठेवण्यात आले आहे.

इटली शासनाच्या तांत्रिक शास्त्राsक्त समिती बरोबर इटालियन फुटबॉल फेडरेशनच्या वरिष्ठ अधिकाऱयांनी कोरोनाच्या सध्याच्या स्थिती बाबत चर्चा केली.  फुटबॉलपटूंच्या सराव प्रशिक्षण शिबीराला  प्रारंभ करण्याबाबत लवरच निर्णय घेतला जाईल,  असे इटलीच्या फुटबॉल फेडरेशनतर्फे सांगण्यात आले.

Related Stories

नीरज चोप्रा : 87.86 मीटर भालाफेक करत पटकावले ऑलिम्पिकचे तिकीट

prashant_c

ऍटलेटिकोकडून बार्सिलोना पराभूत

Patil_p

ऋतुजा-इमेली दुहेरीतील विजेते

Patil_p

मुंबई इंडियन्स निर्धास्त, दिल्ली कॅपिटल्ससमोर मात्र आव्हान

Patil_p

ऑस्ट्रेलिया-झिम्बाब्वे वनडे मालिका लांबणीवर

Patil_p

विंडीज-आयर्लंड यांच्यातील एकमेव टी-20 लढत रद्द

Patil_p
error: Content is protected !!