तरुण भारत

बाहेरून येणाऱयांची गावाबाहेर कुटुंबियांनी सोय करावी

पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी आळवला सूर

प्रतिनिधी/ सातारा

Advertisements

राज्य आणि केंद्र सरकारने इतर ठिकाणी अडकलेल्या कामगार, मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. अगोदरच गावात भितीचे वातावरण असल्याने पुण्या, मुंबईतून येणाऱयांची गावाबाहेर त्यांच्या कुटूंबाने सोय करावी. शासनावर भुर्दंड नको, असा सूर पंचायत समितीच्या मासिक सभेत सदस्यांनी आवळला. दरम्यान, कोरोनामुळे सगळे कारखाने बंद असल्याने शेतकयांना वीज बिल माफ करावे, असा ही ठराव घेण्यात आला.

  सातारा पंचायत समितीची मासिक सभा सभापती सरिता इंदलकर यांच्या अध्यक्षतेखाली व उपसभापती अरविंद जाधव, पंचायत समिती सदस्य आशुतोष चव्हाण, राहुल शिंदे, दयानंद उघडे, जितेंद्र सावंत, पंचायत समिती सदस्या सौ.वसुधारा ढाणें, गटविकास अधिकारी संजय ढमाळ यांच्या उपस्थितीत पार पडली. यावेळी सदस्यांनी केंद्र व राज्य शासनाने नुकताच घेतलेला कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परराज्यात अडकलेले जिल्हावासीय आणण्यासाठी आणि जिह्यातील इतर राज्यातल्या नागरिकांना सोडण्याचा निर्णय चांगला आहे. मात्र, बाहेरून येणाऱया नागरिकांना गावाबाहेर क्वारंनटाइनची सुविधा करण्यात यावी. त्याचा होणारा खर्च त्यांच्या कुटुंबियांनी करावा. याचा बोजा शासनावर पडू नये. याची दक्षता घेण्यात यावी, असा मुद्दा मांडून त्यावर चर्चा झाली. तसेच कोरोनाच्या लढय़ात चांगले काम करणाऱया आपल्या आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, ग्रामसेवक, आरोग्य सेवक यांना विमा कवच देण्यात यावे. ते आपल्या जीवाची पर्वा न करता काम करत आहेत, असा ही ठराव घेण्यात आला. कृषी विभागाच्या आढाव्यात खते बियाणे यावेळी शेतकऱयांना बांधावर पुरवण्यात येणार आहेत, असे कृषी अधिकारी यांनी सांगितले. महावितरण कंपनीचा आढावा घेताना सदस्यांनी शेतकऱयांना वीज माफ करण्यात यावी. कृषी पंपाचे बिल माफ करावे. पावसाळ्यापूर्वी देखभाल दुरुस्ती करण्यात यावी, औद्योगिक क्षेत्र बंद असल्याने शेतकऱयांना 24 तास वीज द्यावी असा ही मुद्दा मांडला.  

सोशल डिस्टन्स आणि व्हिडीओ कॉन्फरसवर सभेत सहभाग

कोरोनाची भीती असल्याने पंचायत समितीची मासिक सभा स्व. अभयसिंहराजे भोसले सभागृहात सोशल डिस्टनन्स पाळून घेण्यात आली. ज्यांना येणे शक्य नाही त्या सदस्य करता नजीकच्या ग्रामपंचायतीच्या संग्राम कक्षात व्हिडीओ कॉन्फरसची सुविधा केली होती. त्यानुसार पंचायत समिती सदस्य संजय घोरपडे, बेबीताई जाधव, छाया कुंभार यांनी सहभाग घेतला होता. इतरांनी मात्र दांडी मारली होती.

Related Stories

लसीसाठी पैसे घेणाऱ्या कर्मचाऱ्याची हकालपट्टी

Patil_p

नगराध्यक्ष माधवी कदम यांनी केली भाजी मंडईची पाहणी

Patil_p

ऊसाच्या ट्रॉलीला ओमनी कारची धडक

Patil_p

शहरात वाढतोय डेंग्यु

Patil_p

महाराष्ट्रात आतापर्यंत 73 टक्के कोरोना लसीकरण

Rohan_P

रुग्णसंख्या वाढल्यास मुंबईतही पुन्हा लॉकडाऊन ; पालकमंत्र्यांचा इशारा

Rohan_P
error: Content is protected !!