तरुण भारत

पोलिस प्रशासनाला शिक्षकांचे पाठबळ

पोलिस मित्र म्हणून जिह्यातील चेक पोस्ट वर शिक्षक तैनात

वार्ताहर/ आनेवाडी

Advertisements

ज्ञानदानाचे कार्य करणाया शिक्षकाना आता कोरोनाच्या संचारबंदी जमावबंदी च्या काळात शैक्षणिक काम सोडून पोलिसांच्या मदतीने पर राज्यातून  तसेच अन्य जिह्यातुन येणाया लोकांची माहिती संकलित करण्यासाठी जिह्यासह सर्व तालुक्या च्या सिमेवर तैनात करण्यात आले असून,यामुळे पोलिस प्रशासनावर येणार ताण कमी झाला असून,शिक्षकांच्या द्वारे नोंदि ठेवण्याचे काम सध्या सुरु आहे

 जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार तीन शिफ्टमध्ये सध्या त्या त्या भागातील शिक्षकांना नेमणुका दिल्या आहेत,जिह्याच्या सिमेवर शिरवळ,जिह्यातील टोल नाके, तसेच तालुक्यात प्रवेश करते वेळी असलेल्या चेक पोस्ट वर पोलिस मित्र म्हणून येणाया नागरिकांच्या नोंदि ठेवण्याचे काम शिक्षक करीत असून,त्यामुळे पोलिसांचा कामाचा भार हलका झाला असून या माहिती संकलन केल्याने येणाया नागरिकांचे माहिती चांगल्या प्रकारे मिळत असून,देश सेवेचे कार्य म्हणून शिक्षक देखील पोलिसांच्या सोबत एक दिलाने काम करताना दिसत आहेत,आनेवाडी येथील टोल नाक्यावर जावली तालुक्यातील शिक्षकांच्या नेमणुका करण्यात आल्या असून या ठिकाणी राजस्थान,गुजरात,झारखंड,मध्यप्रदेश या राज्यातून मोठय़ा संख्येने वाहने येत असून त्यांच्या माहिती घेतल्याने जिल्हा प्रशासन अलर्ट होवून पुढील यंत्रणा राबवित आहे.

         या पूर्वी हेच काम पोलिसांना करावे लागत होते, वाहनांची तपासणी तसेच त्यांची संबंधित रजिस्टर ला माहिती घेणे ही कामे स्वतः पोलिसांना करावी लागत यामधे वेळ खर्ची जात होताच सोबतच अपूया पोलीस बळ यामुळे या कामाचा ताण प्रशासनावर  होता त्यामुळे आता पोलिस मित्र म्हणून जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या शिक्षकांना काम दिल्याने बाहेरुन येणाया नागरिकांचे माहितीचे रजिस्टर अध्यावत होण्यास मदत होउ लागली आहे

Related Stories

खाद्य तेल भेसळ करणाऱ्यांचे परवाने तत्काळ रद्द करा – राज्यमंत्री यड्रावकर

Abhijeet Shinde

गोकुळ शिरगाव एस.टी.कॉलनीत आणखी तीन पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

ग्रामीण यात्रास्थळे विकासासाठी 9कोटी 53 लाखांची गरज

Amit Kulkarni

गंगावेस तालमीतील शड्डूंचा आवाज मंत्रालयात घुमला!

Abhijeet Shinde

पोस्टल कॉलनी पाचगाव येथे आढळले तीन पॉझिटिव्ह रुग्ण

Abhijeet Shinde

कोल्हापूर : कोरोनाच्या नावाखाली डॉक्टरांच्या बदनामीचे प्रयत्न

Abhijeet Shinde
error: Content is protected !!