तरुण भारत

तब्बल 20 वर्षांनी वेरे गटारांची दुरुस्ती

आमदार जयेश साळगावकर यांचा पुढाकार

प्रतिनिधी/ म्हापसा

Advertisements

पावसाळय़ाच्या दिवसात वेरे मार्केटमध्ये दरवर्षी गटारे तुंबून पाणी रस्त्यावर येत होते. यामुळे पावसाळय़ात येथे मोठय़ा प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत होती हे लक्षात घेऊन साळगावचे आमदार जयेश साळगावकर यांनी पुढाकार घेत आणि लॉकडाऊनचा फायदा घेत गेली 20 वर्षाहून अधिक काळ याकडे कुणीही लक्ष दिले नसलेली गटारे उपसून नाल्याची साफसफाई करण्यात आली. या कामामुळे येथील नागरिकांनी आमदार साळगावकर यांचे अभिनंदन केले आहे.

वेरे मार्केटमधील गटारे तुंबून ती रस्त्याखाली गेली होते. गटारामध्ये माती आदी कचरा भरून ती पूर्णतः लुप्त झाली होती. या भागातील गटारे उसपली नसल्याकारणाने त्याचा त्रास येथील दुकानदार, हॉटेल मालकांना दरवर्षी होत होता. डोंगराळ भागातून येणारे गटाराचे तसेच घाणीचे आदी सांडपाणी दरवर्षी दुकानात, हॉटेलात तसेच काही घरात घुसून त्यांचे नुकसान होत होते. याबाबतची माहिती काही दुकानदारांनी स्थानिक आमदार जयेश साळगावकर यांच्या कानावर घातल्याने आमदारांनी त्याची दखल घेत येथील वेरे भागातील प्रमुख सर्व गटार नाले साफ करण्यास प्रारंभ केला आहे. तब्बल 20 वर्षांच्या कालावधीनंतर येथील नाले साफ होत असल्याने वेरेतील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

दरम्यान आता गटार, नाले साफ सफाईनंतर बेती ते नेरूल पूल दरम्यान हॉटमिक्सींग रस्ता काम हाती घेण्यात येईल अशी माहिती आमदार जयेश साळगावकर यांनी दिली. तसेच हे हॉटमिक्सींग मानशेरपर्यंत नेण्यात येणार आहे. काही गटारावर स्लॅब टाकून रस्ता रुंदिकरणाचेही काम हाती घेण्यात आलेले आहे.  वेरे भाग हा पर्यटकदृष्टय़ा विकसित होण्यासाठी काही जंक्शनवर रस्ता रुंदिरण करून यापुढे सुशोभिकरण करण्याचा विचार असल्याचे आमदारांनी सांगितले.

Related Stories

खोल येथील ऑर्किड फुलशेती ‘कोरोना’मुळे कोमेजली

Omkar B

मे महिना ठरला ‘काळा महिना’

Omkar B

फॉर्मसाठी संघर्ष करणाऱया बेंगलोरचा सामना हैदराबादशी

Amit Kulkarni

पेडणे मतदारसंघात भाजप पक्षाचे कमळ फुलणार

Amit Kulkarni

नागरिकत्व कायदय़ासंबंधी होणाऱया गैरप्रचाराला जनतेने बळी पडू नये

Patil_p

विजय सरदेसाई यांनी मतदारांना का खोटी आश्वासने दिले ते स्पष्ट करावे

Amit Kulkarni
error: Content is protected !!