तरुण भारत

विजापूर जिह्यातील मजुरांची वैद्यकीय तपासणी

हलकर्णीहून पायी चालत गाठले बेळगाव

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisements

लॉक डाऊनमुळे अडकलेल्या विजापूर जिह्यातील मजुरांची शुक्रवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये वैद्यकीय तपासणी करण्यात आली. परिवहन मंडळाच्या बसमधून त्यांना गावी पाठविण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्या प्रयत्नांचा भाग म्हणून त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली.

मुद्देबिहाळ तालुक्मयातील हगरगोंड तांडा येथील मजूर गेल्या पाच महिन्यांपासून हलकर्णी परिसरात दाखल झाले होते. कोरोना महामारीच्या पार्श्वभूमिवर झालेल्या लॉकडाऊनमुळे मजुरीही नाही आणि गावही गाठता येत नाही, अशा परिस्थितीत ते अडकून पडले होते. अखेर पायपीट करत गाव गाठण्याचा प्रयत्न करत त्यांनी बेळगाव गाठले आहे.

वाटेत सुळगा (हिंडलगा) येथे आमची उत्तम सोय करण्यात आली. माणुसकीचे दर्शन घडविण्यात आले. मजुरी तर नाही किमान आमच्या गावी तरी जावून पोहोचतो या आशेने चालत बाहेर पडलो होतो. मात्र प्रशासनाने बसची सोय करण्याचे सांगितले आहे. आमच्या समाजाच्या नेत्यांनीही आम्हाला बेळगावात थांबण्यास सांगितले आहे, असे शिवाप्पा चव्हाण या कामगाराने सांगितले.

परिवहन मंडळाच्या बसमधून गावी पाठविण्याआधी मजूर व त्यांच्या कुटुंबियांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यासाठी शुक्रवारी दुपारपासूनच हे मजुर कुटुंबिय सिव्हिल हॉस्पिटलच्या आवारात ठाण मांडून होते. वैद्यकीय तपासणीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांच्यासाठी बसची सोय करण्याची प्रक्रिया सुरु होती.

Related Stories

महसुलातील 50 टक्के रक्कम तरी खर्च करा

Amit Kulkarni

डॉ. कुरणी यांना एनसीसी उपमहानिर्देशकांचे प्रशंसापत्र

Omkar B

शांताई वृद्धाश्रमातर्फे आशा कार्यकर्त्यांचा सत्कार

Amit Kulkarni

प्रवीण सुद यांनी घेतली वरिष्ठ अधिकाऱयांची बैठक

tarunbharat

होमिओपॅथी इम्युनिटी बुस्टर औषधाचे वितरण

Amit Kulkarni

कोनवाळ गल्ली संघाकडे एसआरएस हिंदुस्थान चषक

Amit Kulkarni
error: Content is protected !!