तरुण भारत

संत्र्याच्या सालीमुळे कमी होते वजन…

संत्री खाण्याचा एक वेगळाच आनंद असतो, मात्र संत्र्याच्या सालींचाही वजन कमी करण्यासाठी खूप उपयोग होऊ शकतो.

जीवनसत्व ब-6, कॅल्शDिाम, प्रोव्हिटॅमिन एक, फॉलेट आणि पॉलिफेनॉल्सनं परिपूर्ण असतात संत्री. संत्र्याच्या सालींमध्ये असते फायबर. हे फायबर पाण्यात सहजतेने विरघळते. वजन कमी करण्यासाठी संत्र्याच्या सालींचा उपयोग करावा. संत्री जीवनसत्व ‘क’ने परिपूर्ण असतात. हिवाळय़ात आपण आवडीने संत्री खातो. मात्र असे करताना संत्र्यांची साल फेकून देतो. पण हीच संत्र्याची साल वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरू शकते.

संत्री आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढवते. आपली पाचनक्रिया चांगली करते. संत्र्याच्या सालींमध्ये फायबर मोठय़ा प्रमाणात असतात. त्यामुळेच वजन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो. व्यायाम करण्यासोबतच जर आपण संत्र्यांची साल आपल्या रोजच्या आहारात वापरणे सुरू केले तर आपल्याला खूप सकारात्मक परिणाम दिसू शकतील. संत्र्याची साल शुगर आणि अल्जाइमरच्या रुग्णांसाठीही खूप फायदेशीर ठरतात. संत्री खाण्यासोबतच त्याच्या सालींचं पावडर बनवून ते वापरल्यानं याचा दुप्पट फायदा होतो.

अधिक भूक लागत असेल तर आपण संत्र्यासोबतच त्याची साल सुद्धा खावी. संत्र्याच्या सालांमध्ये मोठय़ा प्रमाणात फायबर असते, त्यामुळे आपले पोट खूप वेळेपर्यंत भरलेले वाटेल. आतडय़ांची स्वच्छता करण्यासाठीही याचा खूप वापर होतो. संत्र्याच्या सालींचा चहा बनवायचा. यासाठी साल उकळत्या पाण्यात टाकावी आणि पाणी उकळून अर्धे झाले की ते गाळून प्यावे. सूप, स्मूदी किंवा सलादच्या रुपातही संत्र्याचं साल आपण खाऊ शकता. यासाठी संत्र्याच्या सालींचे लहान-लहान तुकडे करावे आणि त्याचा वापर करावा.

    संत्र्याच्या साली वाळवून त्याचं पावडर तयार करावं. हे पावडर कोणत्याही खाद्यपदार्थामध्ये मिसळून आपण वापरू शकता. संत्र्याच्या साली नेहमी सावलीमध्ये वाळत घालाव्यात, जेणेकरून त्यातील पोषकतत्त्व कायम राहतील.

कामाक्षी आजगावकर

Related Stories

नियमित व्यायाम करूनही

Amit Kulkarni

टक्कल पडलेल्यांना दिलासा

Omkar B

हे गैरसमज जाणून घ्या

tarunbharat

फायदे उताणे झोपण्याचे

Omkar B

आरोग्यक्षेत्रात काम करणाऱ्यांनी पुढे येऊन नावे नोंदवावीत

triratna

‘नव्याने’ जिमला जाताना…

Omkar B
error: Content is protected !!