तरुण भारत

छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी यांना हृदयविकाराचा झटका, प्रकृती नाजूक

ऑनलाईन टीम / रायपुर

रायपुर :- काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री अजित जोगी येणार हृदयविकाराचा झटका आल्याने आज रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती अधिक नाजूक असल्याकारणाने त्यांना सध्या व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. 

Advertisements


मिळालेल्या माहितीनुसार, अजित जोगी हे आज सकाळी नाश्ता करत असताना अचानक त्यांची तब्येत बिघडली. त्यानंतर त्यांना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. सध्या त्यांची प्रकृती नाजूक असून त्यांना व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले आहे. त्यांच्या सोबत हॉस्पिटलमध्ये त्यांची पत्नी आणि कोटा क्षेत्राचे आमदार रेणू जोगी तसेच अन्य नातेवाईक उपस्थित आहेत. 


नारायण हॉस्पिटलचे संचालक डॉ. सुनील खेमका यांनी सांगितले की, अजित जोगी यांना आजच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती सध्या चिंताजनक असून त्यांच्यावर सध्या उपचार चालू आहेत. 


दरम्यान अजित जोगी यांचे पुत्र आणि माजी आमदार अमित जोगी हे सध्या बिलासपूर येथे असून ते रायपूर येण्यासाठी निघाले आहेत.

Related Stories

कोरोना संकटात काँग्रेस महाविकास आघाडी सोबतच : राहुल गांधी

pradnya p

जयंत पाटलांनी तरूणपणातील ‘तो’ फोटो शेअर करत जागवल्या गृहमंत्र्यांसोबतच्या आठवणी

triratna

भारतात कोरोना रुग्णसंख्येत विक्रमी वाढ; गेल्या 24 तासात 16,922 नवे रुग्ण

pradnya p

सांगली जिल्ह्यात कोरोना रुग्णाचा आकडा 400 पार, 21 नवे रुग्ण

triratna

जगभरातील कोरोनाबाधितांची संख्या 2.40 कोटींवर

datta jadhav

“हे सारं हृदय पिळवटून टाकणारं आहे,” अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांचं भारताला मदतीचं आश्वासन

Shankar_P
error: Content is protected !!