तरुण भारत

इनामबडस येथील विवाहिता बेपत्ता

बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर

प्रतिनिधी / बेळगाव

Advertisements

इनाम बडस (ता. बेळगाव) येथील एक विवाहिता गेल्या चार दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. या संबंधी शनिवारी बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात एफआयआर दाखल करण्यात आले असून पोलीस तिचा शोध घेत आहेत. आपल्या एक वर्षाच्या मुलीला घरीच सोडून ही महिला घराबाहेर पडली आहे.

नकोशी अमित पाटील (वय 20) असे तीचे नाव आहे. सोमवारी 4 मे रोजी पहाटे 5 पासून ती बेपत्ता आहे. या संबंधी तिचा पती अमित पाटील याने बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात फिर्याद दिली आहे. बेपत्ता प्रकरण दाखल करुन पुढील तपास करण्यात येत आहे. नकोशीचे माहेर कोल्हापूर जिह्यातील शाहूवाडी तालुक्मयातील कासरडी येथे आहे. ती तेथेही गेली नाही, असे तिच्या पतीने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

5 फुट उंची, अंगाने सडपातळ, गहू वर्ण, असे तिचे वर्णन आहे. घराबाहेर पडताना तिने पिवळा गाऊन व ओडणी परिधान केली होती. या विवाहितेविषयी कोणाला माहिती मिळाल्यास 0831-2405252 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन बेळगाव ग्रामीण पोलिसांनी केले आहे.

Related Stories

कर्नाटक : पीएम मोदींचा बोम्माईंना फोन, पूर परिस्थितीवर चर्चा

Sumit Tambekar

रोटरी क्लब ऑफ नॉर्थचा अधिकारग्रहण समारंभ

Amit Kulkarni

येळ्ळूर चांगळेश्वरी मंदिरात पुन्हा चोरी

Amit Kulkarni

मलिकवाड येथे पथनाटय़ातून जनजागृती

Patil_p

आझादी का अमृत महोत्सवानिमित्त सायकल रॅली

Amit Kulkarni

वीरभद्रनगरातील पावसाच्या पाण्याची समस्या सोडवा

Amit Kulkarni
error: Content is protected !!