तरुण भारत

धास्ती कायम, कुडचीत सीलडाऊन कडकच

वार्ताहर/ कुडची

 बेळगाव जिल्हय़ात कोरोनाचा हॉटस्पॉट ठरलेल्या कुडचीतील रुग्णसंख्येत वाढच होत आहे. यामुळे येथील सीलडाऊन कडकच करण्यात येत आहे. रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांना क्वारंटाईन करण्यात येत असून क्वारंटाईन केलेल्यांच्या संपर्कातील व्यक्तींनाही क्वारंटाईन आणि होमक्वारंटाईन करण्यात येत आहे. एकूणच कुडचीतील धास्ती कायम असल्याचे चित्र आहे.

   कुडचीत आतापर्यंत 23 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यापैकी कुडची ग्रामीणमध्ये 8 तर कुडची नगरपरिषद क्षेत्रात 15 रुग्णांना बाधा झाली आहे. यामुळे या परिसरात सीलडाऊनची अंमलबजावणी कडकच सुरू आहे. कुडची ग्रामीणमध्ये नुकत्याच आढळलेल्या चार रुग्णांच्या संपर्कातील नागरिकांना क्वारंटाईन करण्यात येत आहे. मात्र कोरोनाबाधिताच्या शेजारी असणारी अनेक कुटुंबे गायब असल्याचे समजते. यामुळे त्यांचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे. तसेच कुडची ग्रामीण आणि शहरी भागातील कोरोनाबाधितांच्या संपर्कातील पहिल्या आणि दुसऱया टप्प्यातील नागरिकांना क्वारंटाईन आणि होमक्वारंटाईन करण्याची मोहीम प्रशासनाने राबविली आहे.

  तसेच कुडचीसह परिसर कंटेन्मेंट झोनमध्ये असल्याने जि. पं. सीईओ राजेंद्र के.व्ही. यांनी केलेल्या सूचनेनुसार सीलडाऊनची अंमलबजावणी कडक करताना कंटेन्मेंट झोनमधून कोणी बाहेर पडणार नाही. त्याबरोबरच कोणी येणार नाही, याची खबरदारी घेण्यात येत आहे. वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता प्रशासनाकडून काही टीमची नेमणूक करण्यात आली आहे. या टीमच्या माध्यमातून घरोघरी तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये कोणाला सर्दी, खोकला किंवा ताप अशी लक्षणे आहेत काय? याची तपासणी करुन याची वरिष्ठांना माहिती पुरविण्यात येत आहे.

Related Stories

जमखंडी नगरपालिकेसमोर कर्मचाऱयांचे निदर्शने

Patil_p

आरपीडी-वडगाव रोडवर बोलेरो वाहन उलटले

Amit Kulkarni

विवाहाची रक्कम दिली मुख्यमंत्री साहाय्य निधीला

Patil_p

हिडकल डॅम भूसंपादन कार्यालयावर जप्तीची कारवाई

Patil_p

भावाच्या मृत्यू पाठोपाठ दोन बहिणींही सोडले प्राण

Patil_p

बटाटे-रताळय़ांची घसरण तर कांदा दरात वाढ

Patil_p
error: Content is protected !!