तरुण भारत

शिराळ्यात वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडात जोरदार पाऊस

पाडळी ते अंत्री रस्त्यावर झाडं पडल्याने वाहतूक काही वेळ ठप्प

शिराळा / वार्ताहर

Advertisements
शिराळा तालुक्यात दुपारच्या सुमारास वादळी वाऱ्यासह ढगांच्या कडकडात सुमारे तासभर जोरदार पाऊस झाला. तर उतरभागातील पाडळी ते अंत्री रस्त्यावर झाडं पडल्याने वाहतूक काही वेळ ठप्प होती. या वादळी वाऱ्यात गोरक्षनाथ मंदिर शेजारी असणाऱ्या युवराज हरी गायकवाड यांच्या शेतातील घरावरील पत्रे उडून गेले आहेत. यात त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

गोरक्षनाथ मंदिर शेजारी दक्षिणेला युवराज हरी गायकवाड यांची शेती आहे. त्यांनी शेतात राहणे करिता व जनावरांच्या साठी पक्के पत्र्याचे शेड वजा घर बांधले होते. विद्युत कनेक्शन देखील होते. आज दुपारी वळीवाचा वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामध्ये या शेड वजा घरावरील सर्व पत्रे उडून गेले आहेत. विद्युत कनेक्शन देखील तारा तुटून बंद पडले आहे. यात त्यांचे हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे. सुदैवाने कोणतीही जीवित हानी झालेली नाही.

Related Stories

चातुर्मासानिमित्य जैन साधु – सांध्वींना प्रवासाला परवानगी

Abhijeet Shinde

श्री उत्तर चिदंबरम नटराज मंदिरात वार्षिक उत्सवानिमित्त धार्मिक कार्यक्रमांना प्रारंभ

Patil_p

कोल्हापूर : सहकारी संस्था निवडणुकांना सहाव्यांदा ब्रेक

Abhijeet Shinde

बीडमध्ये ४०० जणांनी बलात्कार केल्याचा पीडित मुलीचा आरोप

Abhijeet Shinde

कोल्हापूर जिल्हय़ात दिवसभरात 17 पॉझिटिव्ह

Abhijeet Shinde

“आता माझा एककलमी कार्यक्रम…”, मुंबै बँक चौकशी प्रकरणी दरेकरांचा इशारा

Abhijeet Shinde
error: Content is protected !!