तरुण भारत

स्मिता तांबेने शेअर केल्या पहिल्या फोटोशूटच्या आठवणी

पहिलं वहिलं फोटोशूट अभिनेत्रींसाठी खासच असतं. पण हे फोटोशूट आपल्या लहानपणचं असेल तर ते जास्त खास असतं. सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात अभिनेत्री स्मिता तांबे घरीच असल्याने तिला आपल्या आठवणींची शिदोरी उघडून पाहण्याची संधी मिळाली आहे. जुन्या फोटो अल्बममध्ये स्मिताला तिचा लहानपणीचा पहिल्या फोटोशूटचा फोटो मिळाला. जो तिने आपल्या चाहत्यांसोबत शेअर केला आहे.

अभिनेत्री स्मिता तांबे तिच्या पहिल्या फोटोशूटविषयी सांगते, माझ्या आई बाबांनी फार हौसेने लहानपणी माझं पहिलं वहिलं फोटोशूट केलं होतं. खरं तर त्यांनी माझ्यासाठी खास ड्रेस शिवून घेतला होता. ड्रेस तयार झाल्यानंतर त्यांची खूप इच्छा होती की माझं फोटोशूट स्टुडिओतच करायचं. पाठीमागे काश्मीरचं बॅकग्राऊंड होतं. मला लहानपणी वाटायचं आपण खरंच काश्मीरला गेलो होतो. पण तो फोटो स्टुडिओत काढला होता. तो फोटो माझा आवडता फोटो आहे. पुढे ती तिच्या आई-वडिलांविषयी सांगते, आपल्या आयुष्यात अनेक चढ उतार येतात. त्याक्षणी आपले आई-वडीलच आपल्या सोबत असतात. ते आपल्याला सांभाळतात.  या क्वारंटाईनमध्ये आपल्याकडे फार वेळ आहे तर हा वेळ आपण स्वत:साठी देऊया आणि आपण ज्यांच्यावर नितांत प्रेम करतो. त्यांची आठवणं काढुयात असे ती म्हणाली.

Advertisements

Related Stories

‘ओम – द बॅटल विदिन’मध्ये संजना सांघी

Patil_p

ऍक्शन म्हणण्याचे रितेशला लागले ‘वेड’

Patil_p

‘डॉक्टर डॉन’ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला

prashant_c

सोनाली कुलकर्णीचा साखरपुडा; वाढदिवशी पोस्ट केला होणाऱ्या पतीसोबतचा फोटो

Abhijeet Shinde

‘बंटी और बबली 2’चा टीझर सादर

Patil_p

फेमिनाच्या सर्वोत्तम महिलांच्या यादीत सामंथा

Patil_p
error: Content is protected !!