तरुण भारत

उद्धव ठाकरेंचा मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचा मार्ग सुकर

ऑनलाईन टीम / मुंबई :

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर दबाव टाकल्यानंतर काँग्रेसने विधानपरिषदेचा एक उमेदवार आज मागे घेतला. त्यामुळे ठाकरे यांचा विधानपरिषदेवर जाण्याचा आणि मुख्यमंत्रीपदी कायम राहण्याचा मार्ग सुकर झाला आहे.

Advertisements

विधान परिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक होणार आहे. या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या वाट्याला 5 जागा आल्या होत्या. मात्र, महाविकास आघाडीतील तिन्ही पक्षांनी आपले प्रत्येकी 2 उमेदवार उभे केल्याने ही निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता धूसर झाली होती. मात्र, नाराज उद्धव ठाकरेंनी आपण ही निवडणूक लढवणार नसल्याचा निरोप काँग्रेस पक्षश्रेष्ठींना दिला. त्यानंतर आज सायंकाळी झालेल्या महाविकास आघाडीच्या बैठकीत काँग्रेसने आपला एक उमेदवार मागे घेण्याचा निर्णय घेतला. 

Related Stories

“कन्हैया कुमार रंग बदलणारा सरडा, भाजपातही प्रवेश करू शकतो”

Abhijeet Shinde

मुख्यमंत्री ठाकरे घेणार राज्यपालांची भेट

datta jadhav

ऑक्टोबरमध्ये येणार लहान मुलांसाठी कोरोनावरील लस

Abhijeet Shinde

दिलासादायक : महाराष्ट्रात एका दिवसात 4161 रुग्ण कोरोनामुक्त

Rohan_P

… मुख्यमंत्री पवारांच्या ताटाखालचे मांजर झाले आहेत! : भाजप

Rohan_P

अयोध्या : राम मंदिर भूमिपूजन सोहळा संपन्न

datta jadhav
error: Content is protected !!