तरुण भारत

ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत भारताला पाचवे स्थान

वृत्तसंस्था/ बर्लिन

ऑनलाईन नेशन्स कप बुद्धिबळ स्पर्धेत विश्वनाथन आनंदच्या नेतृत्वाखालील भारतीय संघाला पाचव्या स्थानी समाधान मानावे लागले. शनिवारी झालेल्या नवव्या व दहाव्या फेरीतही भारताला पराभवाचा सामना करावा लागला. रविवारी रात्री उशिरा अग्रमानांकित चीन व अमेरिका यांच्यात सुपरफायनल होईल. युरोप संघ 13 गुणासह तिसऱया तर रशियन संघ 8 गुणासह चौथ्या स्थानी राहिला.

Advertisements

नवव्या फेरीत चीनविरुद्ध झालेल्या लढतीत भारतीय संघ 2.5-1.5 फरकाने पराभूत झाला. या लढतीत आनंदला विश्रांती देण्यात आली होती. विदीथ गुजराथी, पी.हरिकृष्ण व हरिका यांना बरोबरीवर समाधान मानावे लागले तर बी अधिबान पराभूत झाला. यानंतर, दहाव्या फेरीच्या लढतीतही रशियाने भारताला 2.5-1.5 असे नमवले. या लढतीत कोनेरु हम्पीने एकमेव विजय मिळवला. हरिकृष्णने बरोबरी स्वीकारली. अधिबान व विदीथ यांना पराभव स्वीकारावा लागल्यामुळे भारताचे या स्पर्धेतील आव्हानच संपुष्टात आले.

विशेष म्हणजे, सहा संघाच्या या ऑनलाईन स्पर्धेत भारताला शेष विश्व संघाविरुद्ध एकमेव विजय मिळवता आला. पाच गुणासह भारतीय संघ पाचव्या स्थानी राहिला. बलाढय़ चीन व अमेरिका यांनी अपेक्षित कामगिरी करताना पहिले व दुसरे स्थान प्राप्त करत अंतिम फेरीत धडक मारली.

Related Stories

मुष्टीयुद्ध संघटनेची निवडणूक लांबणीवर

Patil_p

दक्षिण आफ्रिकेचे सर्व क्रिकेटपटू कोरोना चाचणीत निगेटिव्ह

Patil_p

स्टोक्सचा इंग्लंडतर्फे सर्वाधिक झेल टिपण्याचा विक्रम

Patil_p

रिअल काश्मिरचे विदेशी खेळाडू श्रीनगरमध्ये अडकले

Patil_p

रोहितला टी-20 कर्णधार केले नाही तर भारतीय क्रिकेटचे नुकसान

Patil_p

रशियन डोपिंग निकालात लागण्याची शक्यता अंधुक : सेबॅस्टियन को

Patil_p
error: Content is protected !!