22 C
Belgaum
April 18, 2021
तरुण भारत

देशात कोरोनाने वेग वाढवला; 24 तासात 4213 नवे रुग्ण

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : 

देशात कोरोना संक्रमणाचा वेग वाढला आहे. मागील 24 तासात देशात 4213 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 97 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 

रविवारी एका दिवसात 4213 नव्या रुग्णांची नोंद झाल्याने देशातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 67 हजार 152 वर पोहचली आहे. आतापर्यंत 24 तासातील ही सर्वाधिक आकडेवारी आहे. यापूर्वी देशात 24 तासात 3900 रुग्ण नोंदवले गेले आहेत. आतापर्यंत 20 हजार 916 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर 44 हजार 029 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. देशात आतापर्यंत कोरोनाने 2206 बळी घेतले आहेत. 

 लॉकडाऊनच्या तिसऱ्या टप्प्याला एक आठवडा उरला असतानाही कोरोना रुग्णांची वाढती संख्या आटोक्यात येत नसल्याने रेड झोन आणि कंटेन्मेंट झोनमधील निर्बंध अधिक कडक करण्यात आले आहेत. देशातील मृत्युदर सध्या 4% आहे आणि रुग्ण बरे होण्याची संख्या 31 टक्के आहे, असे असले तरी देखील दररोजच्या वाढत्या रुग्णांची संख्या चिंताजनक आहे.

Related Stories

पाकिस्तानकडे लस खरेदीसाठीही नाहीत पैसे

datta jadhav

देशात 96,551 नवे कोरोना रुग्ण, एकूण रूग्णसंख्या 45.62 लाखांवर

datta jadhav

पाकिस्तान : सिंध प्रांतातील गव्हर्नरला कोरोनाची बाधा

datta jadhav

भारताकडून चीनच्या आणखी 47 अ‍ॅप्सवर बंदी

datta jadhav

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या घोषणेनंतर रैना म्हणाला…

prashant_c

‘फिर मुस्कुराएगा इंडिया… फिर जीत जाएगा इंडिया’ : मोदींकडून व्हिडिओ शेअर

prashant_c
error: Content is protected !!