तरुण भारत

चित्रपट अभिनेता साईप्रसाद गुंडेवार याचे कर्करोगाने अमेरिकेत निधन

ऑनलाईन टीम/वॉशिंगटन

हिंदी चित्रपट तसेच हॉलिवूड चित्रपटांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारणारा अभिनेता साईप्रसाद गुंडेवार (वय-४२) याचे आज, सोमवारी अमेरिकेमध्ये सकाळी साडे सातच्या सुमारास दीर्घ आजाराने निधन झाले. त्याच्या पश्चात पत्नी सपना, आई राजश्री, वडील राजीव असा परिवार आहे. साईप्रसाद गेल्या दोन वर्षांपासून अमेरिकेमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होता.

साईप्रसाद दोन वर्षांपासून ‘ग्लायोब्लास्टोमा’शी (ब्रेन कॅन्सर) झुंज देत होता, अमेरिकेतील लॉस अँजेलिस येथे त्याच्यावर उपचार सुरू होते. अखेर आज त्याची प्राणज्योत मालवली.

साईप्रसादने एमटीव्हीवरील ‘स्प्लिट्सविला पर्व 4’ स्टार प्लस वाहिनीवरील ‘सर्वाइवर’, तसेच अमेरिकेतील लोकप्रिय SWAT, Cagney and Lacey, The Orville, The Mars Conspiracies, ‘द कार्ड’ या मालिकांमध्ये महत्वाच्या भूमिका साकारल्या होत्या. ‘रॉक ऑन’, ‘पप्पू कान्ट डान्स साला’, ‘लव्ह ब्रेकअप जिंदगी’, ‘डेव्हिड’, ‘आय मी और मैं’, ‘पीके’, ‘बाजार’ इत्यादी हिंदी चित्रपटांसोबतच काही हॉलिवूडपट व लघुपटांमध्ये विविध भूमिका केल्या. डॉ. मीना नेरुरकर यांच्या ‘ए डॉट कॉम मॉम’ या एकमेव मराठी चित्रपटात त्याने प्रमुख भूमिका केली आहे.

अभिनेते ऋषी कपूर, अभिनेता इरफान खान यांचे देखील कॅन्सरमुळे निधन झाले. बॉलिवूडच्या या दोन्ही कलाकारांनी देखील परदेशात जाऊन उपचार घेतले होते. अतिशय कमी वयात साईप्रसादचे निधन झाल्याने कलाविश्वातून हळहळ व्यक्त होत आहे.

Related Stories

जीएसटी संकलन 1 लाख कोटींवर

Patil_p

पंतप्रधानांनी काल ‘हेडलाईन आणि कोरे पान’ दिले : पी चिदंबरम

pradnya p

100 अब्जांचा महाल, प्रेयसीकरता शासकीय निधीची लूट

Amit Kulkarni

उत्तराखंडात 400 नव्या कोरोना रुग्णांची नोंद

pradnya p

दिल्ली : लॉक डाऊनमध्ये सायबर गुन्ह्यात 25 टक्क्यांनी वाढ

pradnya p

चाळीस मुस्लीम कुटुंबांचा हिंदू धर्मात प्रवेश

Patil_p
error: Content is protected !!