तरुण भारत

सोलापुरात कोरोनाचे नवे 11 रुग्ण, तिघांचा बळी

प्रतिनिधी / सोलापुर

सोलापुरात  सोमवारी नव्याने 11 कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. आज तिघांचा कोरोनाने बळी घेतला असून आतापर्यंत 17 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 275  वर पोहचली आहे.उर्वरित  217 व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर  यांनी दिली. 

मयत जवाहर नगर येथील 50 नववर्षाचे पूरुष असून 9 मे रोजी सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यानंतर सायंकाळी त्यांचा मृत्यू झाला आणि त्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. दुसरे रुग्ण सदर बझार लष्कर परिसरातील 46 वर्षाची महिला असून आठ मे रोजी सिव्हिल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते.9मे रोजी निधन झाले त्यानंतर तिचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तिसरी व्यक्ती 58 परिसरातील 68 वर्षाचे पुरुष असून मृत्यूनंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. आज एकूण तिघांचा कोरोना पॉझिटिव्हने मृत्यू झाला आहे. आज एकूण 126 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 115 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 11 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. आजच्या कोरोना चाचणीत 6 पुरुष , 5 महिला पॉझिटिव्ह आढळले आहेत. 

आज आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णांपैकी

एकता नगर 1, किसान संकुल,अक्कलकोट रोड 1, जवाहर नगर 1, महालक्ष्मी नगर एमआयडीसी 1, सदर बझार लष्कर 1,मिलिंद नगर 1, बुधवार पेठ 1, कुमठा नाका 1,हुडको कॉलनी 1, रंगभवन 1, पाच्छा पेठ 1 असे रुग्ण आढळले आहेत. आजतागायत 17 जणांचा कोरोनाने  मृत्यू झाला आहे. आजतागायत कोरोनामुक्त झालेल्या 41 जणांना घरी सोडण्यात आले आहेत.तर केगाव येथून आतापर्यंत 225 जणांना घरी सोडण्यात आले.

आत्तापर्यंत पॉझिटिव्ह आलेल्या 275 मध्ये 158 पुरूष तर 117 महिला आहेत. मृतांची संख्या 17 झाली आहे.  217 व्यक्ती उपचार घेत आहेत. एकाच दिवशी 48 कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यामुळे शहर जिल्ह्यात घबराटीचे वातावरण पसरले आहे. 

सोलापूरातील कोरोना सद्यस्थिती 

-होम क्वरटाईनमध्ये : 2578
-एकूण अहवाल प्राप्त : 3200
-आतापर्यंत अहवाल निगेटीव्ह : 2823
-आतापर्यंत अहवाल पॉझीटीव्ह : 275
-अहवाल प्रलंबित : 102
बरे होऊन घरी गेले : 41
मृत- 17 

Related Stories

कोल्हापूर : आता शेतकर्‍यांना मिळणार बांधावरच धडे

triratna

तीर्थक्षेत्र जेजुरीला मिळाला थ्री स्टार मानांकनाचा दर्जा

Patil_p

तासगावात सलग दुसऱ्या दिवशीही कोरोनाने एकाचा बळी

Shankar_P

डीएसकेंच्या संपत्ती लिलावाबाबत नोटीस काढण्याचे आदेश

prashant_c

उस्मानाबाद जिल्ह्यात कोरोनाचा कहर सुरू, आणखी इतक्या रुग्णांची वाढ

triratna

महावितरणला आत्मदहनाचा इशारा

triratna
error: Content is protected !!