तरुण भारत

स्मार्टवॉच विक्रीमध्ये सॅमसंग दुसऱया स्थानी

पहिल्या तिमाहीत 19 लाख युनिट्सची विक्री : 76 लाख विक्रीसह ऍपल सर्वोच्चस्थानी

वृत्तसंस्था/ सियोल

Advertisements

वेयरेबल डिव्हाईसची अर्थात स्मार्ट वॉचची दिवसेंदिवस वाढती लोकप्रियता लक्षात घेता सॅमसंग इलेक्टॉनिक्सने वर्षाच्या पहिल्या तिमाहीत जगातील दुसऱया नंबरचा सर्वात मोठा स्मार्टवॉच विपेता होण्याचे श्रेय मिळवले आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत सॅमसंगने 19 लाख स्मार्टवॉचचे शिपमेंट केले आहे. जे मागील वर्षाच्या तुलनेत सर्वाधिक असल्याची माहिती आहे. 2019च्या पहिल्या तिमाहीत कंपनीने 17  लाख स्मार्टवॉच शिपमेंट केले असल्याची माहिती मार्केट रिसर्च फर्म स्ट्रेटजी ऍनालिटिक्सच्या अहवालातून दिली आहे.

सॅमसंग हा जगातील दुसऱया नंबरचा सर्वात मोठा स्मार्टवॉच विपेता झालेला बँड ठरला असला तरी दक्षिण कोरियात कोरोनाच्या संसर्गामुळे विक्रीचा वेग मंदावला आहे तर गार्मिन यासारख्या प्रतिस्पर्ध्यांचा वावर वाढला आहे.

दुसऱया तिमाहीत घसरणीचे संकेत

देशात व इतरत्र स्मार्टवॉचना मागणी चांगली आहे. कोरोना विषाणूच्या वाढत्या विळख्यामुळे ग्लोबल स्मार्टवॉच शिपमेंट 20 टक्क्मयांनी वाढून 14 लाख युनिट्स राहिली आहे. परंतु हाच वेग येत्या तिमाहीत कायम राहण्याबाबत चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या युरोप आणि युकेमधील लॉकडाऊनच्या कारणामुळे विक्रीवर मोठा परिणाम होण्याचा अंदाज तज्ञांनी व्यक्त केला आहे.

ऍपलची मात्र झेप

ऍपल ब्रँड मात्र या स्पर्धेत सर्वोच्च स्थान कायम राखण्यात यशस्वी झाला आहे. जानेवारी ते मार्च या कालावधीत 76 लाख स्मार्टवॉच शिपमेंट केले आहेत तर मागील वर्षात पहिल्या तिमाहीत ऍपलने 62 लाख स्मार्टवॉचची विक्री केली होती. यामुळे बाजारातील समभाग 54.4 टक्क्मयांनी वधारुन 55.05 टक्क्मयांच्या घरात पोहोचला होता. 11 लाख युनिट्ससोबत गार्मिन तिसऱया स्थानी राहिली आहे.

Related Stories

नवा रियलमी ‘सी21 वाय’ फोन दाखल

Patil_p

सेन्सेक्स, निफ्टी दमदार विक्रमी उंचीवर झेपावले

Patil_p

कृषी अर्थव्यवस्थेच्या मर्यादा

Omkar B

सलग पाचव्या महिन्यात सेवा क्षेत्रात घसरण

Patil_p

‘एस ऍण्ड पी’ने जीडीपी अंदाज घटविला

Amit Kulkarni

ओप्पोने कारखान्यातील काम थांबविले

Patil_p
error: Content is protected !!