तरुण भारत

अफगाणच्या शफाकवर सहा वर्षांची बंदी

वृत्तसंस्था/ काबूल

एपीएल टी-20 तसेच बांगलादेश प्रिमियर लीग (बीपीएल) क्रिकेट स्पर्धेत आर्थिक भ्रष्टाचारामध्ये आपला सहभाग असल्याची अफगाणचा क्रिकेटपटू शफीकुल्लाह शफाक याने कबुली दिल्याने अफगाण क्रिकेट मंडळाने त्याच्यावर सहा वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय रविवारी घेतला.

Advertisements

अफगाण क्रिकेट मंडळाच्या या निर्णयामुळे शफाकला आता क्रिकेटशी संबंधित कोणत्याही घडामोडीमध्ये सहा वर्षे सहभागी होता येणार नाही. 2018 साली झालेल्या पहिल्या अफगाण प्रिमियर लीग टी-20 तसेच 2019 च्या बांगलादेश प्रिमियर लीग टी-20 स्पर्धेत मॅच फिक्सिंग प्रकरणात आर्थिक भ्रष्टाचारामध्ये शफाकचा समावेश होता. अफगाण संघात तो फलंदाज आणि यष्टीरक्षक म्हणून आपली कामगिरी बजावत होता. अफगाण क्रिकेट मंडळाच्या भ्रष्टाचारविरोधी नियमाचा शफाककडून भंग झाल्याने अफगाण क्रिकेट मंडळाने त्याच्यावर कारवाई करताना सहा वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे. 30 वर्षीय शफाकने 24 वनडे आणि 46 टी-20 सामन्यात अफगाणचे प्रतिनिधीत्व केले आहे.

Related Stories

बीबीएमपी निवडणूक : कर्नाटक हायकोर्टाच्या आदेशाला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती

Abhijeet Shinde

सांगली : खानापूरात एस टी बसवर दगडफेक; दोघांवर गुन्हे दाखल

Sumit Tambekar

विदेशी संघांना क्वारंटाईनची सक्ती नाही

Patil_p

वारणा नदीपात्रात आढळला पुरुषाचा मृतदेह

Abhijeet Shinde

सिंचन आयोगाच्या चिपळूणच्या शिफारशीबाबत पाठपुरावा करणार

Patil_p

इचलकरंजी नगरपरिषदेचे मुख्याधिकारी दीपक पाटील यांची तडकाफडकी बदली

Abhijeet Shinde
error: Content is protected !!