तरुण भारत

अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्याकरिता दीपा मलिक खेळातून निवृत्त

नवी दिल्ली / वृत्तसंस्था

पॅरा-ऍथलिट गोळाफेकपटू दीपा मलिकने पॅरालिम्पिक क्रीडा क्षेत्रातून निवृत्त होत असल्याची घोषणा सोमवारी केली. भारतीय पॅरालिम्पिक कमिटीच्या अध्यक्षपदाची निवडणूक लढवण्यासाठी तिने हा निर्णय घेतला. देशातील पॅरा-ऍथलिट्सची नव्याने जडणघडण करण्यासाठी आपण पुढाकार घेत असल्याचे ट्वीट दीपाने यावेळी केले.

Advertisements

राष्ट्रीय क्रीडा नियमावलीनुसार, खेळत असणाऱया कोणत्याही ऍथलिटला फेडरेशनमधील कोणत्याही पदाची निवडणूक लढवता येत नाही. त्यास अनुसरुन दीपा मलिकने सोमवारी निवृत्त होत असल्याची घोषणा केली. नियम व मागदर्शक सूचनावलीचा आदर राखण्यासाठी निवृत्ती जाहीर करणे आवश्यक होते, असे ती म्हणाली.

‘भारतात जे कायदे आहेत, नियम आहेत, त्याचे पालन करावेच लागेल. त्यास अनुसरुन मी हा निर्णय घेतला. पण, पुन्हा खेळावे, असा आग्रहच झाला तर 2022 आशियाई स्पर्धेसाठी मी माझ्या निर्णयाचा फेरविचार करु शकते. माझ्यातील ऍथलिट, माझ्यातील खेळाडू कधीही मागे पडणार नाही, याची मला खात्री आहे. सध्या निवडणूक लढवणे, हे लक्ष्य आहे आणि त्यासाठी खेळातील सक्रिय सहभाग थांबवणे अर्थात निवृत्ती घोषित करणे महत्त्वाचे ठरेल’, याचा दीपा मलिकने पुढे उल्लेख केला.

‘निवृत्तीचा निर्णय घेणे कठीण होते. पण, खेळाच्या भल्यासाठीच मी या निर्णयाप्रत आले आहे. खेळाने जे दिले, ते खेळाला परत देणे महत्त्वाचे असते आणि त्यासाठी आपण पुढाकार घेत आहोत, याचा मला सार्थ अभिमान आहे. वास्तविक, आंतरराष्ट्रीय पॅरालिम्पिक कमिटी पदाधिकाऱयांना देखील खेळात उतरण्याची संधी उपलब्ध करुन देते. पण, मी भारतीय क्रीडा तरतुदीशी संलग्न असून त्यानुसार मला निवडणूक लढवण्यासाठी सक्रिय खेळातून माघार घेणे क्रमप्राप्त होते’, असेही दीपाने येथे स्पष्ट केले.

दीपा मलिक ही देशातील आघाडीची पॅरा-ऍथलिट असून गतवर्षी दि. 29 ऑगस्ट रोजी तिला प्रतिष्ठेच्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्काराने सन्मानित केले गेले आहे. हा प्रतिष्ठेचा पुरस्कार संपादन करणारी ती पहिलीच भारतीय महिला पॅरा-ऍथलिटही ठरली. याशिवाय, पॅरालिम्पिक स्पर्धांमध्ये पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. तिने कारकिर्दीत 58 राष्ट्रीय व 23 आंतरराष्ट्रीय पदके जिंकली आहेत. दीपाला पद्मश्री व अर्जुन पुरस्काराने देखील सन्मानित केले गेले आहे.

Related Stories

पदार्पणात द्विशतक झळकावणारा कॉनवे सहावा फलंदाज

Amit Kulkarni

जोफ्रा आर्चर आयपीएलमधून बाहेर

Patil_p

5 नोव्हेंबरचे भारतीय क्रिकेटशी अनोखे नाते!

Patil_p

भारताचे तीन मुष्टीयोद्धे अंतिम फेरीत

Patil_p

फुटबॉलपटू डेम्बा बा निवृत्त

Patil_p

विजेत्या गोकुळम केरळाचे कोझिकोडेत भव्य स्वागत

Patil_p
error: Content is protected !!