तरुण भारत

जगभरात 15 लाख रुग्ण कोरोनामुक्त

ऑनलाईन टीम / वॉशिंग्टन : 

जगभरात 42 लाख 55 हजार 990 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. त्यापैकी 15 लाख 27 हजार 487 रुग्ण या आजारातून पूर्णपणे बरे झाले असून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. वर्ल्डोमीटर या संकेतस्थळाने ही आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. 

Advertisements

 मागील 24 तासात जगभरात 74 हजार 228 जणांना कोरोनाची बाधा झाली आहे. तर 3403 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना विषाणूने आतापर्यंत जगभरात 2 लाख 87 हजार 137 जणांचा बळी घेतला आहे. अजूनही 24 लाख 41 हजार 121 ॲक्टिव्ह केसेस असून, त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्यामधील 46 हजार 936 केसेस गंभीर आहेत.  

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव जगात सर्वाधिक आहे. अमेरिकेत आतापर्यंत 13 लाख 85 हजार 834 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 81 हजार 795 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेनंतर स्पेनमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. स्पेनमध्ये 2 लाख 68 हजार 143 जणांना कोरोनाची बाधा झाली असून, 26 हजार 744 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. इटलीत आतापर्यंत 2 लाख 19 हजार 814 जणांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. तर 30 हजार 739 जण दगावले आहेत. 

Related Stories

बायडेन प्रशासनात ‘महिला राज’

datta jadhav

कैदेतील मारेकरी झाला गणितज्ञ

Patil_p

पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करणारा तरुण पोलिसांच्या ताब्यात

Abhijeet Shinde

दिल्लीत दिवसभरात 1,139 नवे कोरोना रुग्ण; 32 मृत्यू

Rohan_P

…तर ग्रीनकार्ड कोटा पद्धत रद्द करेन : बायडेन

datta jadhav

कराचीत भीषण स्फोट, 14 ठार

datta jadhav
error: Content is protected !!