तरुण भारत

गोवा बागायतदारचे व्यवस्थापक दत्तप्रसाद पटवर्धनना अपघाती मृत्यू

प्रतिनिधी / मडगाव

आर्लेम जंक्शन, फातोर्डा येथे सोमवारी सायंकाळी उशिरा झालेल्या एका रस्ता अपघातात मूळ बांदा -सतमटवाडी येथील व सध्या दुर्गाभाट -फोंडा येथे राहणारे  दत्तप्रसाद पटवर्धन (47) यांना मृत्यू आला.

Advertisements

पटवर्धन हे गोवा बागायतदार, फातोर्डाचे व्यवस्थापक होते व काम संपवून ते फोंडा येथे जात असताना हा अपघात झाला.

झारखंड राज्यातील चालक चालवत असलेल्या जीए-06-टी-9211 क्रमांकाच्या ट्रकची धडक बसल्याने हा अपघात झाला. गंभीररित्या जखमी झालेल्या पटवर्धन यांना सरकारी इस्पितळात नेत असताना वाटेतच त्यांना मृत्यू आला अशी फातोर्डा पोलिसांनी माहिती दिली.

प्राप्त माहितीनुसार झारखंड राज्यातील हा ट्रक कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीतून सामनाची ने -आण करीत होता. चालक अत्यंत निष्काळजीपणे ट्रक चालवत होता आणि त्यातूनच हा अपघात घडला. भर वेगात जात असलेल्या या ट्रक चालकाचा ताबा गेल्यामुळे रस्त्याच्या दुभाजकाला धडक देऊन दुसऱया बाजुच्या रस्त्याकडे जाण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. फातोर्डा पोलिसांनी लगेच घटनास्थळी धाव घेऊन गंभीररित्या जखमी झालेल्या पटवर्धन यांना सरकारी इस्पितळात नेले. मात्र, तेथील डॉक्टर त्यांना वाचवू शकले नाहीत.

ट्रक चालक जितेंद्र पाल (35) याच्याविरुद्ध फातोर्डा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. या आरोपीला अटक करण्यात आली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक कपील नायक यांनी दिली.

पटवर्धन यांच्यामागे पत्नी, एक मुलगा व एक मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या अकाली निधनाने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Related Stories

पोर्ट टाऊन जेसीआयतर्फे गरजूंना जीवनावश्यक वस्तू प्रदान

Omkar B

गोव्यातील बार व्यवसाय खुला करण्याची खासदार फ्रांसिस सार्दीन यांची मागणी

Patil_p

पंतप्रधानांकडून श्रीपाद नाईक यांची फोनवरुन विचारपूस

Amit Kulkarni

कॅसिनोंसह किनारपट्टीत 144 चा फज्जा

Amit Kulkarni

झाडे पडल्याने कारवार – मडगाव रस्ता बराच वेळ वाहतुकीस बंद

Omkar B

दक्षिण व उत्तरेत जिल्हा पंचायतीवर भाजपाचीच सत्ता स्थापन होणार

Patil_p
error: Content is protected !!