तरुण भारत

सातारा जिल्ह्यात दोन रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटिव्ह

67 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह तर 142 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

सातारा / प्रतिनिधी :

Advertisements

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय येथे ठाणे येथून प्रवास करुन आलेला एक 20 वर्षीय युवक व कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथे निकट सहवासित म्हणून दाखल असणारा 29 वषीय पुरुष असे एकूण 2 जणांचे अहवाल कोरोना बाधित (कोविड-19 ) आले आहेत, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर यांनी दिली आहे.

67 जणांचे अहवाल आले निगेटिव्ह
क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथील 26, वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय येथील 5, कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड येथील 19 व ग्रामीण रुग्णालय, कोरेगाव येथील 17 असे एकूण 67 जणांचा अहवाल निगेटिव्ह आले असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी कळविले आहे.

142 जणांना केले विलगीकरण कक्षात दाखल

क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय, सातारा येथे 9 व वेणूताई चव्हाण उपजिल्हा रुग्णालय, कराड येथे 133 असे एकूण 142 जणांना विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. या सर्वांच्या घशातील स्त्रावांचे नमुने बी.जे. वैद्यकीय महाविद्यालय, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. गडीकर यांनी दिली.

जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना बाधित झालेल्या व्यक्तिंची संख्या- 121 झाली असून या पैकी उपचार घेत असलेले बाधीत रुग्ण (कोविड-19)- 84, कोरोना मुक्त होवून घरी गेले रुग्ण- 35, कोरोना बाधित मृत्यु झालेले 2 रुग्ण आहेत.

Related Stories

सातारा : गोडोलीत बिबट्याच्या तावडीतून वाचवले श्वानाचे प्राण

Abhijeet Shinde

म्युकरमायकोसिसच्या उपचारांचे दर निश्चित!

Rohan_P

आरएसएस तालिबान तुलना प्रकरण : जावेद अख्तरांच्या अडचणी वाढल्या

Abhijeet Shinde

माझ्यामुळे ठाकरे सरकारमधील मंत्र्यांची झोप उडाली

datta jadhav

ठेकेदाराच्या मनमानीविरोधात नगरसेवकाने दिला आत्मदहनाचा इशारा

datta jadhav

सातारा : शाहूनगरीत बाप्पा विराजमान

Abhijeet Shinde
error: Content is protected !!